‘तंत्रज्ञान स्वीकारल्यास विकास’
By Admin | Updated: October 1, 2016 01:21 IST2016-10-01T00:46:23+5:302016-10-01T01:21:04+5:30
अंबाजोगाई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही, असे सांगत यशस्वी उत्पादनाची पंचसूत्री कृषी विस्तार अधिकारी अरुण गुट्टे यांनी सांगितली.

‘तंत्रज्ञान स्वीकारल्यास विकास’
अंबाजोगाई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही, असे सांगत यशस्वी उत्पादनाची पंचसूत्री कृषी विस्तार अधिकारी अरुण गुट्टे यांनी सांगितली.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना परिसरात ऊस विकास परिषदप्रसंगी ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी नांदुरे तर परिषदेला मार्गदर्शक म्हणून माजी कार्यकारी संचालक दत्ता शिंदे, विजय आग्रे, अनिल काळे, मुख्य शेतकी अधिकारी देशमाने व टपरे, ज्येष्ठ संचालक रमेशराव आडसकर, व्हाईस चेअरमन हनुमंतराव मोरे, संचालक राजकिशोर मोदी, दत्तात्रय पाटील आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना गुट्टे म्हणाले, यावर्षी जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ऊसाचे उत्पादन वाढविता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक करताना दत्ता शिंदे म्हणाले, ऊस लागवड तंत्र, उत्पादकता वाढविण्यासंदर्भात अंबाजोगाई सहकार साखर कारखान्याच्या वतीने ऊस विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षात अवर्षणामुळे या भागातील ऊस उत्पादन कमी झाले. मांजरा धरणात पुरेसा पाऊस नसल्याने व ऊस नसल्याने सलग तीन वर्ष अंबासाखर ज्येष्ठ संचालक रमेशराव आडसकर यांनी कारखान्याच्या अडचणी सांगून मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ए.के.भिसे, आभार संचालक मारूती साळुंके यांनी मानले. यावेळी राजेसाहेब देशमुख, राजेश कराड, अनंतराव पाटील, मदन यादव, नगरसेवक बबन लोमटे, किसनराव बावणे, प्रा.वसंतराव चव्हाण,शेषेराव नांदवटे,बालासाहेब बोराडे, भारतराव गालफाडे उपस्थित होते. (वार्ताहर)