शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

छत्रपती संभाजीनगरात ६ कोटी खर्च करून ७ उद्यानांचा विकास, वेगवेगळ्या भागात उद्याने होणार

By मुजीब देवणीकर | Updated: June 27, 2024 19:51 IST

केंद्र सरकारच्या भांडवली अनुदानातून मनपाला प्राप्त झालेल्या ६ कोटी रुपयांच्या निधीतून ७ उद्याने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यान सोडले तर शहरात एकही चांगले उद्यान नाही. आता टीव्ही सेंटर रोडवरील स्वामी विवेकानंद, सिडको एन-७ येथील उद्याने नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात दर्जेदार उद्याने असावीत, अशी संकल्पना प्रशासक जी. श्रीकांत यांनी मांडली. त्यानुसार नियोजन करण्यात आले. एमजीएम परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारक, सातारा परिसरात तीन, उल्कानगरी, कॅनॉट गार्डन, गारखेडा भागातील उद्याने विकसित केली जाणार आहेत. उद्यान उभारणीत पश्चिम विधानसभेला झुकते माप देण्यात आले, हे विशेष.

शहराची लोकसंख्या १८ लाख गृहित धरली तर मोठी व चांगली उद्याने नाहीत. ज्याठिकाणी उद्याने आहेत, तिथे विकास नाही. भकास अवस्थेमुळे नागरिक पाय ठेवत नाहीत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी चांगली उद्याने असावीत, असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी मागीलवर्षीच नमूद केले होते. लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवत मैदानावर आणले पाहिजे, अशी संकल्पनाही मांडली. मागील काही दिवसांमध्ये सिद्धार्थ उद्यानात संगीत कारंजे, इलेक्ट्रिक ट्रेन, एन-७ येथे नौका विहार, स्वामी विवेकानंद उद्यानात बुलेट ट्रेन सुरू करण्यात आली. नागरिकांकडून याठिकाणी चांगला प्रतिसादही मिळू लागला. केंद्र सरकारच्या भांडवली अनुदानातून मनपाला प्राप्त झालेल्या ६ कोटी रुपयांच्या निधीतून ७ उद्याने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मनपाकडून ७ जागाही निश्चितसातारा परिसरातील गट नंबर १६८ मधील दीड एकर जागा, गट नंबर ९२/९३ मधील जागा, गट नंबर १४४ मधील जागेवर उद्याने विकसित होणार आहेत. याठिकाणी सिंथेटिक ट्रॅक, मैदान, ओपन जीम, पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी बाके आदी सुविधा राहतील. एमजीएम परिसरातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकातील तळ्याचे सुशोभिकरण, सिडको एन-१ मधील कॅनॉट गार्डन, उल्कानगरी भागातील आदित्य नगर उद्यान, गारखेडा भागातील सर्व्हे नंबर ५३ मधील उद्यानांचा समावेश आहे.

चार हरितक्षेत्र विकासकेंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधीतून महापालिकेने चार ठिकाणी हरितक्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. इटखेडा भागातील गोल्डन सिटी, भावसिंगपुऱ्यातील पेठे नगर, साकेत नगर, सिडको एन-२ मधील कामगार चौक येथील मनपाच्या मोकळ्या जागांवर हरितक्षेत्राचा विकास केला जाणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका