शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विकासकामांचा खोळंबा; महापालिकेची प्रत्येक काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 13:10 IST

गाजावाजा करून एखाद्या कामाचा श्रीगणेशा करायचा आणि नंतर ते काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती अलीकडे मनपात वाढली आहे.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : महापालिका दिवाळखोरीत निघाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. तिजोरीत निधी नसल्याने विकासकामांचा खोळंबा झाला आहे. ज्या कामांसाठी शासन निधी प्राप्त आहे, ती कामेही मनपाकडून वर्षानुवर्षे होत नाहीत. गाजावाजा करून एखाद्या कामाचा श्रीगणेशा करायचा आणि नंतर ते काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती अलीकडे मनपात वाढली आहे. सत्ताधारीही पन्नास विकासकामांची यादी घेऊन बसतात, त्यामुळे एकही काम पूर्ण होत नाही.

वल्लभभाई पटेल यांचा पुतळा

शहागंज चमन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मागील वर्षी करण्यात आला. दोन महिन्यांत चबुतरा आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून १ जानेवारी २०१९ रोजी पुतळ्याचे लोकार्पण होेणार असल्याची घोषणा केली होती. १ जानेवारी २०२० उजाडण्यास अवघे ३७ दिवस शिल्लक आहेत. अद्याप पुतळ्याचे लोकार्पण, सुशोभीकरण मनपाला करता आले नाही. पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी २०१० मध्ये तत्कालीन नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी ठराव ठेवून मनपाकडून २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. यासाठी तत्कालीन खा. चंद्रकांत खैरे यांनीही ४० लाख रुपयांचा निधी दिला आहे. 

लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता जालना रोडला पर्यायी रस्ता व्हावा, अशी ओरड दहा वर्षांपासून सुरू आहे. महापालिकेने मोठी आर्थिक जुळवाजुळव करून लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्याचे काम मे २०१८ मध्ये सुरू केले. दीड वर्षामध्ये मनपाला हे काम पूर्ण करता आले नाही. तब्बल १४ कोटी रुपये या रस्त्याच्या कामावर खर्च करण्यात येणार आहेत. हा निधी मनपाच्या तिजोरीत पडून असतानाही प्रशासनाला काम पूर्ण करून घेण्यासाठी वेळ नाही. 

टी.व्ही. सेंटर शॉपिंग कॉम्प्लेक्सटी.व्ही. सेंटर येथील व्यापारी संकुलाचे काम दोन वर्षांपूर्वी मनपाने पूर्ण केले. येथील ५० गाळे लिलाव पद्धतीने विकण्यात आले. महापालिकेच्या तिजोरीत तब्बल १२ कोटींचा निधी जमा झाला. ४६ गाळ्यांचे बांधकाम पूर्ण केले. त्यासाठी ३ कोटी ७७ लाख ४४ हजार रुपये खर्च करण्यात आले. आजपर्यंत गाळेधारकांना महापालिकेने ताबा दिलेला नाही. लिलावात ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने घेतली त्यांच्याकडून उर्वरित निधीही मनपाने जमा करून घेतला नाही. सध्या शॉपिंग कॉम्प्लेक्स शोभेची वास्तू बनली आहे. 

महिला नगरसेविकांचा कार्यकाळ संपत आला...शहरात वेगवेगळ्या भागात दहा महिला शौचालय उभारण्यासाठी विद्यमान महिला नगरसेविकांनी चंगच बांधला होता. पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला तरी महापालिका प्रशासनाला औरंगपुरा वगळता एकाही ठिकाणी महिला शौचालय बांधता आले नाही. ३१ आॅक्टोबर २०१८ ची डेडलाईन महिला नगरसेविकांनी प्रशासनाला दिली होती. ३१ आॅक्टोबर २०१९ संपले तरी काम झाले नाही, हे विशेष.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपा