देगलुरात पद्मावार तर बिलोलीत तिघे शर्यतीत

By Admin | Updated: August 8, 2014 00:35 IST2014-08-08T00:32:43+5:302014-08-08T00:35:03+5:30

देगलूर : नगराध्यक्षा वंदना कांबळे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने उर्वरित अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी अध्यक्षपदाची लवकरच निवड होणार आहे़

In Deulgurad Padmavar, in Biloli, in all three races | देगलुरात पद्मावार तर बिलोलीत तिघे शर्यतीत

देगलुरात पद्मावार तर बिलोलीत तिघे शर्यतीत

देगलूर : नगराध्यक्षा वंदना कांबळे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने उर्वरित अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी अध्यक्षपदाची लवकरच निवड होणार आहे़ देगलूर नगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने यावेळेस सुद्धा याच पक्षाचा अध्यक्ष निवडला जाईल़ काँग्रेसच्या काही नगरसेवकांकडून ही निवड एकतर्फी होवू नये असे प्रयत्न केले जातील, मात्र ते निष्फळ ठरण्याचीच शक्यता आहे़
देगलूर पालिकेतील उर्वरित अडीच वर्षाचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी निश्चित झाला आहे़ मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाने देगलूर पालिकेवर आपली पकड कायम ठेवली आहे़ शासनाच्या विविध योजना खेचून आणल्य आहेत़ महाराष्ट्राच्या राजकारणात काँगे्रस व राष्ट्रवादीची आघाडी असली तरी स्थानिक राजकारणात हे दोन्ही पक्ष कडवे प्रतिस्पर्धी आहेत़
स्थानिक निवडणूक काळात किंवा काही प्रसंगी हा कडवेपणा टोकाला गेल्याचेही पहावयास मिळाले़ दहा वर्षांपासून पालिका सत्तेतून दूर झालेल्या काँग्रेस नगरसेवकांनी प्रारंभीच्या काळात विकासकामे व सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला़ परंतु विरोध करून काहीही साध्य होत नसल्याचे दिसत असल्याने काही काँग्रेस नगरसेविकांनी सबका साथ सबका विकास हे व्यावहारिक धोरण स्वीकारले़ आमच्याही प्रभागात विकासकामे झाली पाहिजेत असे म्हणणाऱ्यांनी आपणास किंवा आपल्या समर्थकास कामे मिळावित अशी भूमिका घेतली आणि विरोध संपुष्टात येत गेला़
राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मावार यांच्या नगरसेविका पत्नी उज्ज्वला पद्मावार यांची अध्यक्षपदाच्या नावाबाबत चर्चा आहे़ लक्ष्मीकांत पद्मावार यांचे राष्ट्रवादीच्या प्रदेश नेत्यांशी असलेले निकट संबंध आणि त्या माध्यमातून देगलूरच्या विविध विकासकामांचे प्रस्ताव मार्गी लावण्याचे केलेल्या प्रयत्नामुळे उज्ज्वला पद्मावार यांच्या नावास विरोध होण्याची शक्यता तूर्तास दिसत नाही़ एकंदरीत देगलूर नगराध्यक्षपदाची निवड एक औपचारिकता राहणार असून वंदना कांबळे ते उज्ज्वला पद्मावार असा खांदेपालट होईल़ (वार्ताहर)
दुष्काळ जाहीर करा
उमरी : तालुक्यात अल्प पावसामुळे दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली ंसून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे टाकले आहे. म्हणून राज्य शासनाने उमरी तालुका दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर साहेबराव शिंदे, बालाजी सावंत, गोपाळ राठौर, बालाजी पवार, गोविंद सावंत, कैलास पवार, गोविंद शिंदे, आबाजी पवळे, राजू पांचाळ आदींच्या सह्या आहेत़
बिलोलीत पटणे यांची भूमिका महत्त्वाची
बिलोली : आगामी उर्वरित अडीच वर्षाकरिता पालिकेचे नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असून जिल्हा प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम १६ आॅगस्टचा जाहीर केल्याने सत्ताधारी पक्षात हालचाली वाढल्या आहेत़ अकरा सदस्यीय शहरविकास आघाडीकडे तीन इच्छुक असून आघाडीचे अध्यक्ष माजी आ़ गंगाधर पटणे काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे़
सतरा सदस्यीय पालिकेत शहरविकास आघाडीची सत्ता आहे़ काँग्रेसकडे सहा सदस्य आहेत़ पंचवार्षिक काळातील पहिले अडीच वर्ष खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव होते़ आघाडीच्या अंतर्गत करारानुसार दोघांना संधी मिळाली़ नगराध्यक्ष जमनाबाई खंडेराय यांचा कार्यकाळ २२ आॅगस्ट रोजी संपत आहे़ जिल्हा प्रशासनाने नव्या नगराध्यक्ष निवड संदर्भात निवडणूक कार्यक्रम जारी केला आहे़ पालिकेचे अध्यक्षपद ओबीसीकरिता राखीव आहे़

Web Title: In Deulgurad Padmavar, in Biloli, in all three races

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.