मिटमिट्यात बिबट्याची दहशत

By Admin | Updated: December 11, 2014 00:46 IST2014-12-11T00:15:19+5:302014-12-11T00:46:55+5:30

औरंगाबाद : मिटमिटा गट नं. २७८ मध्ये दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने भेदरलेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाला माहिती कळविली अन् पथकाने सायंकाळपर्यंत शेत व इतर भागांत पाहणी केली;

Deterioration of the dump | मिटमिट्यात बिबट्याची दहशत

मिटमिट्यात बिबट्याची दहशत

औरंगाबाद : मिटमिटा गट नं. २७८ मध्ये दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने भेदरलेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाला माहिती कळविली अन् पथकाने सायंकाळपर्यंत शेत व इतर भागांत पाहणी केली; परंतु मिळालेला ठसा हा बिबट्याचा नसून तो इतर प्राण्याचा (तरस किंवा कुत्र्याचा) असावा, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.
वन्यजीव अन्न व पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर मानवी वस्त्यांकडे येत असल्याचे निदर्शनास येत आहे. सोयगाव तालुक्यातून एक बिबट्या आठवड्यापूर्वीच शहरातील सिद्धार्थ उद्यानात आणून ठेवला आहे. साजापुरातही बिबट्याचे दर्शन झाले. दरेगाव, कडेठाण इ. ठिकाणीही वन्य जीव असल्याची माहिती वन विभागाकडे आहे. दोन दिवसांपासून मिटमिटा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे भाऊसाहेब आधाने, नूर खान यांनी सांगितले. त्यानुसार वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली; परंतु त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.

Web Title: Deterioration of the dump