कल्पना असतानाही सरकार गाफिल राहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:04 IST2021-05-09T04:04:02+5:302021-05-09T04:04:02+5:30

पैठण : कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे माहीत असताना आरोग्यसेवेच्या बाबतीत गाफिल राहिलेले राज्य सरकार अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे ...

Despite the idea, the government remained oblivious | कल्पना असतानाही सरकार गाफिल राहिले

कल्पना असतानाही सरकार गाफिल राहिले

पैठण : कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे माहीत असताना आरोग्यसेवेच्या बाबतीत गाफिल राहिलेले राज्य सरकार अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पैठणमध्ये केला. कोरोनासंदर्भात तहसील कार्यालयात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी प्रशासकीय बैठक घेतली. यादरम्यान तालुक्यात रुग्णांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री दानवे म्हणाले की, राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचे कोविड नियंत्रणात महाराष्ट्र अपयशी ठरत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या राज्य सरकारकडे कोणतीही योजना नाही. त्यामुळे ते जबाबदारीपासून दूर पळत केंद्र सरकारवर आरोप करीत आहेत. केंद्राने सर्व राज्यांत सार्वजनिक आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी १६३ प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटच्या इंस्टॉलेशनची मंजुरी जानेवारी महिन्यात दिली. यापैकी १० ऑक्सिजन प्लांट इंस्टॉलेशनची मंजुरी महाराष्ट्राला दिली होती; परंतु महाराष्ट्र सरकारने तातडीने पाऊले न उचलल्याने राज्यात गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याचे दानवे म्हणाले. यावेळी महिला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणनाना गायकवाड, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, ॲड. बद्रीनारायण भुमरे, कांतराव औटे, लक्ष्मण औटे, विजय चाटुपळे, सतीश आहेर, महेश जोशी, नम्रता पटेल, भाऊसाहेब बोरूडे, बंडू आंधळे आदी उपस्थित होते.

---- प्लॉट सुरू करण्याचे निर्देश ----

केंद्रीय मंत्री दानवे यांनी शनिवारी पैठण येथील कोविड सेंटर व रुग्णालयात उभारण्यात येत असलेल्या प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटच्या इंस्टॉलेशनची पाहणी करून दोन दिवसात प्लाॅट सुरू करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनास दिले. पैठण तालुक्यासाठी ५०० पीपीटी किट व ५००० सॅनिटायझर बॉटल देण्याची घोषणा केली. पैठणसाठी ऑक्सिजन बेडची संख्या वाढवून व्हेंटिलेटर उपलब्ध करा अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या.

Web Title: Despite the idea, the government remained oblivious