शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

सरकारकडून तगडा पगार, तरी आम्ही लाच खाणार; वाढत्या लाचखोरीने महसूल प्रशासन बदनाम

By विकास राऊत | Updated: June 16, 2025 15:26 IST

महसूल विभागात महिनाभरात तीन अधिकारी, एक लिपिक, दोन खासगी एजंट एसीबीच्या सापळ्यात

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात तहसीलदार आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरूद्ध लाचखोरीची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाची लख्तरे वेशीवर टांगली जात आहेत. गेल्या महिनाभरात क्लास वन अधिकारी तीन, एक लिपिक, दोन खासगी एजंट लाचखोरीच्या प्रकरणात अडकले. शासनाकडून चांगले वेतन असतानाही अधिकारी - कर्मचारी लाच घेत असल्यामुळे महसूल प्रशासनाची बदनामी होत आहे. महसूलमधील अनेक अधिकाऱ्यांचे खासगी वसुली एजंट असून, काहींनी मर्जीतील कर्मचारीही बदली करून जिल्हाधिकारी कार्यालयात आणले आहेत.

महिनाभरातील ही प्रकरणे...अपर तहसीलदार नितीन गर्जे यांचे १५ मे रोजी प्रकरण घडले. त्यांचे दोन खासगी एजंटही एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर २७ मे रोजी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिराेळकर हे बडी रक्कम घेताना सापडले. दिलीप त्रिभुवन हा लिपीकही सोबत अडकला. त्यानंतर २४ रोजी कांचन कांबळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी ही लाचेच्या सापळ्यात अडकली.

सहा महिन्यात अडकलेले अधिकारी-कर्मचारीएसीबीच्या आकडेवारीनुसार वरील अधिकाऱ्यांसह पैठणमधील तहसीलदार महेश सावंत, चंद्रकांत शेळके आणि सारंग चव्हाण, शहरातील महसूल सहायक शरद पाटील, हरीश शिंदे, सहा. महसूल अधिकारी काशीनाथ बिरकलवाड, ग्राम महसूल अधिकारी प्रवीण दिलवाले, दिलीप जाधव, अमिता लंगडे अडकले.

महिनाभरातील लाच मागणीची प्रकरणे...निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर : १८ लाखांची मागणी; ५ लाख घेताना अटकलिपीक दिलीप त्रिभुवन : १८ लाखांची मागणी ५ लाख घेताना अटकअपर तहसीलदार नितीन गर्जे : ६० हजार घेताना दोन ‘पंटर’ अटकेतपुरवठा निरीक्षण अधिकारी कांचन कांबळे : ४० हजार घेताना अटक

सातव्या वेतन आयोगानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतनपदाचे नाव.................... मूळ वेतन श्रेणी................ प्रारंभिक मूळ वेतन........ अंदाजित एकूण मासिक वेतननिवासी उपजिल्हाधिकारी....... ६७,७०० ते २,०८,७०० ............... ६७,७००...................... ९०,००० ते १,३०,०००तहसीलदार........................ ५३,१०० ते १,६७,८००........... ५३,१००................... ७५,००० ते १,१०,०००अपर तहसीलदार................ ४४,९०० ते १,४२,४००........... ४४,९००................. ६०,००० ते ९०,०००पुरवठा निरीक्षण अधिकारी.......... ३८,६०० ते १,२२,८०० ..........३८,६०० .................. ५५,००० ते ८०,०००तलाठी ........................... २९,२०० ते ९२,३००................ २९,२००............... ४०,००० ते ६०,०००लिपीक ................... १९,९०० ते ६३,२००..................... १९,९००................... २८,००० ते ४५,००० 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारी