मर्जीतील ठेकेदारांना मेवा
By Admin | Updated: September 16, 2014 01:37 IST2014-09-16T01:28:59+5:302014-09-16T01:37:23+5:30
विकास राऊत , औरंगाबाद महापालिकेच्या लेखा विभागातून सध्या मर्जीतील बड्या कंत्राटदारांचे धनादेश देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लहान व किरकोळ कंत्राटदारांना कुणीही वाली नसल्यासारखे झाले आहे.

मर्जीतील ठेकेदारांना मेवा
विकास राऊत , औरंगाबाद
महापालिकेच्या लेखा विभागातून सध्या मर्जीतील बड्या कंत्राटदारांचे धनादेश देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लहान व किरकोळ कंत्राटदारांना कुणीही वाली नसल्यासारखे झाले आहे. त्यातूनच अधिकारी व कंत्राटदारांमध्ये हाणामारी होण्यापर्यंत मजल गेली आहे. कंत्राटदारांना कोणत्या प्राधान्याने धनादेश दिले जातात, त्याचे बिंग आज लोकमतने फोडले आहे.
गेल्या आठवड्यात सिटीचौक पोलीस ठाण्यात अफरातफर करणारे बाबूराव मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असताना तेच लेखा विभागात बिनधास्तपणे मर्जीतील कंत्राटदारांचे धनादेश लिहीत होते. त्यांच्या अवतीभोवती धनादेश मिळावा, यासाठी अनेक कंत्राटदारांचा गराडा होता. एकीकडे पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे धनादेश वाटपाचे काम जोरात सुरू आहे, तेही मर्जीतील कंत्राटदारांसाठीच. यामुळेच पालिकेत अराजकता निर्माण झाली असून, अधिकारी व कंत्राटदारांमध्ये हाणामारी होण्यापर्यंत वेळ गेली आहे.
सर्वांना आवडे लेखा विभाग
पालिकेतील काही महाभागांची लेखा विभागात १० वर्षांपासून घडी बसली आहे. त्या महाभागांनी अर्थचक्राची पूर्ण घडी विस्कटून टाकली आहे. कुठल्याही कामांमध्ये चिरीमिरी हा त्यांचा पॅटर्न त्यांना मालामाल करीत आहे. त्या मर्जीतील शिपाई, लिपिकांची बदली मागील अनेक वर्षांपासून कुठेही होत नाही. नवीन कर्मचाऱ्यांना त्या विभागात संधीही दिली जात नाही. ही मक्तेदारी मोडीत निघावी, यासाठी आयुक्तांना आज कंत्राटदारांनी निवेदन दिले. 1
कामाचे बिल देण्यासाठी तगादा लावणाऱ्या प्रशांत रामराव चव्हाण या ठेकेदारास मनपा लेखाधिकारी संजय पवार यांनी १४ रोजी मारहाण केली. चव्हाण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. मुकुंदवाडी येथे त्यांनी ड्रेनेजलाईनचे काम केले होते.
2या कामाचे बिल मागण्यासाठी ते मनपा लेखाधिकाऱ्यांच्या घरी गेले. तेथून त्यांनी त्यांना संत एकनाथ रंगमंदिर येथे येण्यास सांगितले. त्यानंतर चव्हाण हे रंगमंदिर येथे गेले असता रविवार असताना त्रास का देतो, असे विचारून पवार यांनी चव्हाण यांना मारहाण केली. यात चव्हाण हे जखमी झाले. त्या मारहाणीचा आज कं त्राटदारांनी निषेध केला. 3
तसेच आयुक्त पी. एम. महाजन यांना निवेदन देऊन पवार यांच्यावर कारवाईची मागणी केली. ६ महिन्यांपासून किरकोळ कामे करणाऱ्या कंत्राटदारांना पालिका बिल अदा करीत नाही, अशी तक्रार सचिन महापुरे, प्रवीण म्हस्के, तुळशीराम बकले, अनिल गाडगे, सुरेश चौधरी, अमोल दाभाडे आदी ७० जणांनी केली आहे.
लिपिक मोरे यांनी केलेल्या फसगतीप्रकरणी आयुक्त पी. एम. महाजन यांनी मागविलेला अहवाल मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांनी तयार केला असून, त्यावर आयुक्तांनी अजून काहीही निर्णय घेतलेला नाही.
४दरम्यान, संगनमत करून ११ लाख ४४ हजार रुपयांची कंत्राटदाराची रक्कम बोगस खातेदारास देणाऱ्या मोरे या कारकुनाला निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेतील लेखा विभागातील ८ कोटींचे धनादेश पळवापळवीनंतर लेखा विभागातील अनागोंदी सप्टेंबर महिन्यात चव्हाट्यावर आली. लिपिक बाबूराव मोरे व कंत्राटदारांनी मिळून दुसऱ्या ठेकेदाराच्या नावाने बँकेत बोगस खाते उघडून नालेसफाईच्या बिलाचे ११ लाख ४४ हजार रुपये मनपा लेखा विभागातून काढले.
४लिपिक मोरे, ठेकेदार मुख्तार खान मजीद खान, आयडीबीआय बँकेच्या उस्मानपुरा शाखेतील कर्मचारी अजय पारधे यांनी साई कन्स्ट्रक्शन्स नावाने बोगस खाते उघडले.
४ मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांच्याकडे बिल तपासण्याची जबाबदारी आहे. तर धनादेश देण्याची जबाबदारी लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडे आहे.