चारही जागा लढविण्याची तयारी- देशमुख
By Admin | Updated: September 5, 2014 00:13 IST2014-09-04T23:42:21+5:302014-09-05T00:13:22+5:30
परभणी : जिल्ह्यातील विधानसभेच्या चारही जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली असून, काँग्रेसकडून या चारही जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करण्यात आली

चारही जागा लढविण्याची तयारी- देशमुख
परभणी : जिल्ह्यातील विधानसभेच्या चारही जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली असून, काँग्रेसकडून या चारही जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी दिली़
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी शहरातील पक्ष कार्यालयात करण्यात आला़ प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आणण्यात आलेली प्रचार ज्योत येथे प्रज्ज्वलित करण्यात आली़ त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळणार असल्याचे सांगितले़ जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे़ त्यामुळे येथून निवडणूक लढविण्याची तयारी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले़ पक्षाची प्रचार ज्योत या चारही विधानसभा मतदार संघात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़ यावेळी माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, बाजार समितीचे उपसभापती आनंद भरोसे, मनपा विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, काँग्रेस प्रदेश सचिव बाळासाहेब देशमुख, इरफा नूर रहेमान खान, जलालोद्दीन काजी, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, बाळासाहेब फुलारी, रवी पतंगे, नगरसेवक डॉ़ विवेक नावंदर, तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख, मलेका गफार, प्रवीण देशमुख आदींची उपस्थिती होती़ (जिल्हा प्रतिनिधी)