देशमुख-कव्हेकरांचे ‘हम साथ साथ हैै’..
By Admin | Updated: October 6, 2014 00:14 IST2014-10-06T00:06:31+5:302014-10-06T00:14:12+5:30
लातूर : मध्यंतरी जे घडले, बिघडले, पण जे घडले त्यातून काही बिघडले नाही. शिवाजीराव पाटील कव्हेकर विरुद्ध अमित देशमुख अशी लढत व्हावी,

देशमुख-कव्हेकरांचे ‘हम साथ साथ हैै’..
.
लातूर : मध्यंतरी जे घडले, बिघडले, पण जे घडले त्यातून काही बिघडले नाही. शिवाजीराव पाटील कव्हेकर विरुद्ध अमित देशमुख अशी लढत व्हावी, अशी कोणाची डिमांड होती माहीत नाही. पण खतपाणी मिळाले नाही, हे चांगले झाले. आपण सर्वजण हातात हात घालून विकास गतिमान करू, असे प्रतिपादन माजी मंत्री अमित देशमुख यांनी रविवारी येथे केले.
कव्हा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर होते. मंचावर अॅड. व्यंकट बेद्रे, प्रा.बी.व्ही. मोतीपवळे, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, विद्याताई पाटील, दीपमाला मस्के, सहदेव मस्के, रागिणी यादव, नीळकंठ पवार यांची उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले, लातूर ग्रामीणच्या तिकिटाची खूप चर्चा झाली. मात्र काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत केले. प्रास्ताविक भानुदास घार यांनी केले. यावेळी सरपंच नेताजी मस्के, सुदाम रुकमे, सुंदर पाटील, प्रमोद पाटील, नवनाथ किनीकर, वलीपाशा पठाण, अमर पाटील उपस्थित होते.
लातूर ग्रामीणसाठी मी उमेदवारी मागितली होती. पक्षाने त्रिंबकनाना भिसे यांना दिली. तो निर्णय पक्षश्रेष्ठींचा होता. कार्निव्हलच्या सभेत झालेल्या प्रकारानंतर अनेकांनी देशमुख-कव्हेकरांत वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला. काहींनी आमच्यात कायमस्वरूपी वाद निर्माण व्हावा म्हणून बिब्बाही घातला. मात्र मी कशालाही बळी न पडता काँग्रेससोबतच राहिलो. त्यामुळे तन आणि मनाने माजी राज्यमंत्री अमित देशमुख व काँग्रेस पक्षासोबत काम करणार आहे. आपण सर्वजण हातात हात घालून पक्षाला विजयी करू, असे माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले.