शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशीदारू दुकान हटवा आंदोलन तीव्र; अनाड ग्रामपंचायतच्या व्हरांड्यात भरली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 18:37 IST

देशी दारू दुकान इतरत्र हलविण्यात येत नाही तो पर्यंत विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार....

सिल्लोड: तालुक्यातील अनाड येथील ७५ ते८० विद्यार्थीनी शाळेत जाण्यावर बहिष्कार टाकला असून शनिवारी सकाळी अनाड ग्रामपंचायत कार्यालयाच्या व्हरांड्यात त्यांनी स्वतः ची शाळा भरवली. यामुळे आता देशी दारूचे दुकान हटवा आंदोलन गावात तीव्र झाले असून प्रशासनाची कोंडी झाली आहे.

जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभाग यांनी परवानगी देऊन अजिंठा गावातील देशी दारूचे दुकान अजिंठा - अनाड रस्त्यावर मागील आठवड्यात स्थलांतरित केली.अनाड रस्त्यावर सुरू झालेल्या दारू दुकानाला अनाड ग्रामस्थ आणि येथील शाळेतील विद्यार्थीनींनी विरोध दर्शविला आहे. जोपर्यंत दारू दुकान हलविण्यात येत नाही तोपर्यंत अनाड गावातील विद्यार्थी अजिंठा येथे शिक्षणासाठी शाळेत जाणार नाही,  ते बहिष्कार टाकतील असा निर्णय, अनाड ग्रामस्थांनी घेतला. यानुसार गावात ग्रामपंचायतच्या व्हरांड्यात शाळा भरवण्यात आली.येथे विद्यार्थी स्वतः अभ्यास करतील अशी माहिती संदीप मानकर यांनी दिली.

अहवाल शासनाला पाठविणारदारू दुकान हटविण्याबाबत वाद वाढल्याने उत्पादन शुल्क इन्स्पेक्टर डहाके यांनी अनाड ग्रामस्थांची भेट घेऊन जवाब घेतले, त्यानंतर एक अहवाल शासनाला पाठविणार असल्याचे सांगितले. मात्र ग्रामस्थांचा त्यात समाधान झालं नाही व त्यांनी दारू दुकान हलविण्याची आग्रही मागणी आहे. जोपर्यंत दुकान हटत नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा निर्णय घेतला.

याप्रसंगी अनाड गांवचे माजी सरपंच आत्माराम मुके, माजी पोलीस पाटील भास्करसिंग पवार, अजबसिंग जाधव, माजी ग्रा.पं.सदस्य बाबासाहेब गोंडे, विद्यमान उपसरपंच प्रवीण जाधव, ग्रा.पं.सदस्य भागवत शिंदे, ग्रा.पं.सदस्य गजानन गदाई, ग्रा.पं.सदस्य संदीप मानकर, ग्रा.पं. सदस्य निलेश पवार, गजानन खंडाळकर सहित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण