शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या घरासाठी तरूणीची वणवण !

By admin | Updated: November 28, 2014 01:12 IST

बीड : गेली वर्षभरापासून एका तरूणीला तिच्या घराचा पत्ता हवा आहे. आई वडीलांना भेटायचं आहे परंतु नेमकं ना गावाचे नाव माहिती आहे ना राज्य.

बीड : गेली वर्षभरापासून एका तरूणीला तिच्या घराचा पत्ता हवा आहे. आई वडीलांना भेटायचं आहे परंतु नेमकं ना गावाचे नाव माहिती आहे ना राज्य. वर्षभरापासून परप्रांतातून आलेली एक तरूणी सध्या येथील आश्रय अल्पमुदती निवासगृहात आहे. तिला काहीच आठवत नाही आणि काही सांगताही येत नाही. परंतु आपल्या कुटुंबात पुन्हा जाण्याची उत्सुकता मात्र तिला लपविता येत नाही.साधारणपणे तीस वर्षाची ही तरूणी असून तिला तिच्या स्वत:च्या नावाशिवाय काहीच आठवत नाही. रजनी असे ती आपले नाव सांगत असून चौदा महिन्यांपूर्वी माजलगाव तालुक्यातील जायकोचीवाडी परिसरात ती एकटीच फिरत असताना गावकऱ्यांनी पोलीसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलीसांनी तिला बीड येथील आश्रय अल्पमुदती निवासगृहात पाठविले. या निवासगृहात दोन महिने ठेवल्यानंतर वैद्यकीय सल्यानुसार तिला पुणे येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. वर्षभर उपचार घेतल्यानंतर आता पुन्हा तिला येथील निवासगृहात पाठविण्यात आले असून आता तिला तिचे स्वत:चे घर हवे आहे़ परंतु तिला आपला पत्ता आठवत नाही आणि काहीच धडपणे सांगता येत नाही. तिच्या सुरूवातीच्या बोलण्यावरून ती पश्चिम बंगालमधील असावी, असा पोलीसांनी अंदाज बांधला असून तिला माजलगाव परिसरात नेमके ती कशी आली ? कोणी आणून सोडले ? आणि आता तिला नेमके कोठे जायचे आहे, हे कोडे कायम आहे़आश्रय अल्पमुदती निवासगृहाच्या उषा जाधव आणि आशा धनवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ती तिला सांगितलेल्या सूचनांचे पालन करते. आता तिला मराठीही समजू लागले आहे. तिच्या घराचा पत्ता शोधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. (प्रतिनिधी)