अंमळनेर येथे उपसभापती मुंदडा यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:03 IST2021-06-23T04:03:26+5:302021-06-23T04:03:26+5:30

कायगाव : पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सुमित मुंदडा यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा अंमळनेर वस्ती येथे सत्कार करण्यात आला. मुंदडा ...

Deputy Speaker Mundada felicitated at Amalner | अंमळनेर येथे उपसभापती मुंदडा यांचा सत्कार

अंमळनेर येथे उपसभापती मुंदडा यांचा सत्कार

कायगाव :

पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सुमित मुंदडा यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा अंमळनेर वस्ती येथे सत्कार करण्यात आला.

मुंदडा अंमळनेर येथील सरपंच होते. गावातील व्यक्ती पंचायत समिती उपसभापती झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन मुंदडा यांनी यावेळी दिले.

यावेळी सरपंच मुक्ताताई कर्जुले, उपसरपंच मनीषा साळवे, बाबासाहेब भरपुरे, कायगावचे सरपंच हरिचंद्र माळी, मोहसीन शेख आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात राजू पूरम, अंकुश कर्जुले, खंडेराव गवारे, नंदू मिसाळ, अंबादास पंडित, अप्पासाहेब मिसाळ, किरण साळवे, दिलीप चव्हाण, अफजल पठाण, राजू पठाण, कडूबाबा पठाण, हबीब शेख, रघुनाथ मिसाळ, नामदेव मिसाळ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----

फोटो :

पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सुमित मुंदडा यांची निवड झाल्यानंतर अंमळनेर वस्तीत सत्कार करताना नागरिक.

220621\aher madhukar aher_img-20210622-wa0041_1.jpg

अंमळनेर येथे मुंदडा यांचा सत्कार करताना नागरिक.

Web Title: Deputy Speaker Mundada felicitated at Amalner