उपआयुक्त हजारे अपघातात गंभीर
By Admin | Updated: March 12, 2017 23:24 IST2017-03-12T23:21:26+5:302017-03-12T23:24:26+5:30
वडीगोद्री : औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीपासून जवळच असलेल्या दुनगाव शिवारात कार व ट्रकच्या धडकेत विभागीय उपआयुक्त (विकास कामे) औरंगाबाद जखमी झाले आहेत.

उपआयुक्त हजारे अपघातात गंभीर
वडीगोद्री : औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीपासून जवळच असलेल्या दुनगाव शिवारात कार व ट्रकच्या धडकेत विभागीय उपआयुक्त (विकास कामे) औरंगाबाद जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दुपारी साडतीन वाजेच्या सुमारास घडली.
याविषयी अधिक माहिती अशी की, बीड येथून औरंगाबादकडे जाणारी कार (एमएच २३ एडी १६६४) व औरंगाबाद येथून येणारा ट्रक (टीएन २८ एए ५६७६) यांची गाडी पुढे काढण्याच्या प्रयत्नात असताना समोरासमोर धडक झाली. धडक जोराची असल्याने परिसरात एकच आवाज झाला. या कारमधील सूर्यकांत हजारे (वय ५३ रा. बीड विभागीय उपआयुक्त विकासकामे औरंगाबाद) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हाताला व डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ औरंगाबाद येथे हलविण्यात आले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती कळताच गोंदी पोलिसांनी घटना स्थळी येऊन पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास जमादार आहेर हे करीत आहे. (वार्ताहर)