उपनगराध्यक्षांच्या निवडी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 23:15 IST2017-01-03T23:11:49+5:302017-01-03T23:15:17+5:30
अंबाजोगाई/धारुर : अंबाजोगाई व धारुर या दोन पालिकांमध्ये मंगळवारी उपनगराध्यक्षांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.

उपनगराध्यक्षांच्या निवडी बिनविरोध
अंबाजोगाई/धारुर : अंबाजोगाई व धारुर या दोन पालिकांमध्ये मंगळवारी उपनगराध्यक्षांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. धारुरात भाजपच्या मीनाक्षी गायकवाड व अंबाजोगाईत सारंग पुजारी यांची वर्णी लागली. दोन्ही पालिकांमध्ये स्वीकृत सदस्यही निवडण्यात आले.
अंबाजोगाईत काँग्रेसच्या नगराध्यक्षा रचना सुरेश मोदी यांनी पदभार स्वीकारला. येथे राकाँ १६, भाजप ७ व काँग्रेस ६ असे बलाबल आहे. उपनगराध्यक्षपदासाठी राकाँचे सारंग अरुण पुजारी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला. स्वीकृत सदस्य म्हणून राकाँकडून माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम, भाजपचे कमलाकर कोपले, काँग्रेसकडून अमोल लोमटे या तिघांचेच नामनिर्देशन पत्र आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या निवड प्रक्रियेसाठी पीठासन अधिकारी म्हणून रचना मोदी यांनी काम पाहिले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा झाला. (वार्ताहर)