सिल्लोड तहसीलसमोर वंचितची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:04 IST2021-07-07T04:04:51+5:302021-07-07T04:04:51+5:30
बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ...

सिल्लोड तहसीलसमोर वंचितची निदर्शने
बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, पळशी ते सिल्लोड बस सेवा सुरू करावी आदी मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी बनेखा पठाण, तालुका महासचिव के.के. जगताप, तालुकाध्यक्ष शालिक शेळके, शहराध्यक्ष अनवर पठाण, इरफान पठाण, समाधान जोगदंडे, मुश्ताक पठाण, अविनाश भालेराव, सय्यद शमिम, कैसर पठाण, शेख बिलाल, शकिल पटेल, सुभाष जगताप आदी उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन तहसीलदार विक्रम राजपूत यांना देण्यात आले.
फोटो :
050721\img-20210705-wa0320.jpg
कॅप्शन
विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विक्रम राजपूत यांना देताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दिसत आहे.