जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा

By Admin | Updated: June 9, 2016 23:54 IST2016-06-09T23:48:23+5:302016-06-09T23:54:05+5:30

कन्नड : तालुक्यासाठी मंजूर पीक विम्याची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्त झाली आहे. ही रक्कम बँक शाखांना वर्ग करण्यात आली आहे.

Deposit of crop insurance in the district bank branches | जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा

जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा

कन्नड : तालुक्यासाठी मंजूर पीक विम्याची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्त झाली आहे. ही रक्कम बँक शाखांना वर्ग करण्यात आली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत सदर रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
वडनेर शाखेत १ हजार १७० सभासदांसाठी ६० लाख ६३ हजार ७१३ रु., वासडीसाठी १ हजार ६४३ सभासदांना ६० लाख ७१६ रु., बहिरगाव २९१ सभासद १९ लाख ७ हजार १७ रु., अंधानेर १ हजार ८५९ सभासद १ कोटी २७ लाख १५ हजार ९२९ रु., औराळा १ हजार ३०७ सभासद ५८ लाख ५७ हजार ३७ रु., शेलगाव २ हजार ७५ सभासद ८६ लाख ५६ हजार ५०२ रु., हतनूर ७४४ सभासद ४९ लाख २१ हजार ८६३ रु., पिशोर १ हजार ८२८ सभासद १ कोटी ७ लाख ४४ हजार ५७८ रु., करंजखेड १ हजार ८२२ सभासद ७७ लाख ४३ हजार ९८७ रु.
कन्नड २ हजार ३६४ सभासद १ कोटी ३५ लाख ५७ हजार ४०३ रु., कन्नड (मार्के ट यार्ड) ८० सभासद ५ लाख १८ हजार ४९२ रु., कन्नड (साखर कारखाना) १ सभासद ४ हजार ५ रु., चिकलठाण २ हजार ८ सभासद ९४ लाख ८२ हजार ९२३ रु., चिंचोली ३ हजार ८८४ सभासद १ कोटी ७० लाख ७८ हजार ६२ रु., देवगाव ४८३ सभासद २८ लाख ४४ हजार ११४ रुपये, चापानेर १ हजार १२४ सभासद ६६ लाख ६१ हजार १९१ रुपये, जेऊर ३५३ सभासद १३ लाख ६५ हजार ९४९ रुपये.
नागापूर ४७४ सभासद ३० लाख ८९ हजार ६७ रुपये, नागद १ हजार ९३४ सभासद १ कोटी २५ लाख २६ हजार ३६० रुपये, नादरपूर १ हजार २२३ सभासद ६७ लाख ७९ हजार ९५७ रुपये, नाचनवेल २ हजार ५११ सभासद १ कोटी ४१ लाख २१ हजार २५३ रुपये याप्रमाणे रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
येत्या आठ ते दहा दिवसांत ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे सोपानराव कवडे यांनी दिली.
जि.म. बँकेमार्फ त ३० हजार ११ शेतकऱ्यांनी ४० लाख ३५ हजार ८८८ रुपये हप्ता भरून पीक विमा उतरविला होता. हप्त्यापोटी १५ कोटी २६ लाख ४० हजार १२५ रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला असून ही रक्कम बँकेला प्राप्त झाली आहे. तालुक्यातील विविध बँक शाखांकडे वर्ग करण्यात आली आहे.

Web Title: Deposit of crop insurance in the district bank branches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.