शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विठूनामाच्या गजरात संत एकनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:38 IST

वारकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य पथक, तीन पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले आहेत.

पैठण (औरंगाबाद) : भानुदास एकनाथ असा जयघोष करत टाळमृदंगाच्या गजरात सायंकाळच्या (६.३५ वा.) सुमारास गुरुवारी शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या पादुका असलेली पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी पालखीस निरोप देण्यासाठी गागाभट चौकातील पालखी ओटा परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. १९ दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी पंढरपूर येथे पोहचणार आहे. 

पालखी संत एकनाथ महाराज यांच्या मंदिरातून मार्गस्थ होताच ठिकठिकाणी भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. मराठवाडा, खान्देश भागातील वारकरी पंढरपूर आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोबत मोठ्या संख्येने जातात. यामुळे रविवार दुपारपासून विविध वाहनाने जालना, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जळगाव आदी भागातील वारकरी पैठण शहरात दाखल झाले होते. शहरातील विविध मठात वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.  

आज दुपारी बारा वाजता पालखीप्रमुख रघुनाथ बुवा गोसावी हे शेकडो वारकऱ्यांसह शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या पादुका घेण्यासाठी गावातील नाथवाड्यात दाखल झाले. यावेळी टाळ मृदगांच्या निनादात, धन्य आज दिन संत दर्शनाचा हा अभंग घेण्यात आला. पादुका पालखीत ठेऊन पालखी पंरपरेनुसार गावातील मंदीरातून संत एकनाथ महाराज यांचा जयघोष करत बाहेरील नाथ समाधी मंदीरात गेली. तेथे भाविकांनी भक्ती भावाने समाधी दर्शन घेऊन पालखी भाविकांच्या दर्शनासाठी गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर ठेवण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर पालखी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली.

पालखीस निरोप देण्यासाठी  माजी आमदार चंद्रकांत घोडके, विलास भुमरे, नंदलाल काळे, सुरज लोळगे, शेखर शिंदे, सुचित्रा जोशी, नीता परदेशी,  चंद्रशेखर पाटील, सोमनाथ परदेशी, निमेश पटेल,  ,  रेखाताई कुलकर्णी, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे,   पवन लोहीया, संजय कोरडे, शिवा पारवे,  प्रा संतोष गव्हाणे, शाम लोहिया , दिलीप मगर , ,रघुनाथ ईच्छैया, शिवा पारिख, सोमनाथ परळकर,   सोमनाथ भारतवाले, भिकाजी आठवले , दत्ता फासाटे,  , अनिल घोडके,  तुषार पाटील, सुनिल रासणे,  दिनेश पारिख , विजय चाटुपळे ,महेश जोशी ,बजरंग लिंबोरे ,उमेश पंडुरे, राजू टेकाळे , भूषण कावसानकर, कृष्णा मापारी, ईश्वर दगडे, संतोष सव्वासे, अश्विनी लखमले,  कांचन लेंभे, सचिन ज्योतिक, संतोष धापटे, विजय चाटुपळे, सतिश आहेर, संभाजी सव्वाशे, पंकज चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.  पालखीस निरोप देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, पोलीस उपअधिक्षक विशाल नेहूल, पोलीस निरीक्षक किशोर पवार, तहसीलदार दत्ता निलावाड,  नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे, आदीसह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. 

वारकऱ्या प्रती सेवाभाव...संत एकनाथ महाराज दिंडीत सहभागी वारकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य पथक, तीन पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले आहेत.  जि.प. माजी सभापती विलास भुमरे यांच्यातर्फे साहित्य ठेवण्यासाठी वारकऱ्यांना रेक्झीन बैग वितरीत करण्यात आल्या. वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी रेनकोटचे वाटपही करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते शाम लोहिया यांच्या वतीने दिंडी मार्गावर वारकऱ्यांसाठी मोफत चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी सामाजिक संस्थानी पुढाकार घेतल्याचे आज दिसून आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAshadhi Ekadashiआषाढी एकादशी