गोरोबा काकांच्या पालखीचे प्रस्थान
By Admin | Updated: November 2, 2016 00:55 IST2016-11-02T00:51:55+5:302016-11-02T00:55:10+5:30
तेर : येथील श्री संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये होणाऱ्या कार्तिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मंगळवारी मार्गस्थ झाला.

गोरोबा काकांच्या पालखीचे प्रस्थान
तेर : येथील श्री संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये होणाऱ्या कार्तिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मंगळवारी मार्गस्थ झाला. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून निरोप देण्यात आला.
पंढरपुरात होणाऱ्या कार्तिक सोहळ्यानिमित्त जाणाऱ्या या पालखी सोहळ्यात शेकडो वारकऱ्यांचा सहभाग असतो. मंगळवारी सकाळी माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाल्यानंतर वाजत-गाजत ग्रामस्थांनी पालखीला निरोप दिला.
ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत मोठ्या संख्येने वारकरी या सोहळ्यात सहभागी झालेआहेत. पालखीच्या पुढेपारंपारिक धनगरी नृत्य सादर करण्यात आले. तेरसह परिसरातील गावातून भाविक यावेळी दर्शनासाठी उपस्थित होते. ही पालखी हिंगळजवाडी, वरूडा, उस्मानाबाद, भातंब्रा, वैराग, ढोराळा, यावली, खैराव, अनगर, रोपाळा आदी गावातून दहा नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चंद्रभागेच्या तीरावर पोहोंचणार आहे.
तेथील कार्तिक सोहळा पार पडल्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी पालखी परतीसाठी निघणार असून, २३ नोव्हेंबर रोजी ते तेरमध्ये पोहोंचणार आहे. (वार्ताहर)