विभागीय व्यवस्थापक आल्या आणि गेल्या

By Admin | Updated: December 25, 2015 00:04 IST2015-12-24T23:55:28+5:302015-12-25T00:04:20+5:30

उमरी : दक्षिण मध्यरेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक अरूणासिंह यांनी उमरी स्थानक व परिसराची पाहणी करून औपचारिकता पार पडली़

The departmental managers came and last | विभागीय व्यवस्थापक आल्या आणि गेल्या

विभागीय व्यवस्थापक आल्या आणि गेल्या

उमरी : दक्षिण मध्यरेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक अरूणासिंह यांनी उमरी स्थानक व परिसराची पाहणी करून औपचारिकता पार पडली़ वर्षानुवर्षे येथील मुलभूत सुविधांबाबत मात्र केवळ आश्वासनांची खैरातच मिळाली़
उमरीवासियांच्या वतीने यावेळी अनेक मागण्या सादर करण्यात आलया़ मुख्य म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, गाडीतून चढ-उतार करताना वृद्ध व महिलांना कसरत करावी लागत आहे़ खरे तर ही काही प्रवाशांनी किंवा नागरिकांनी मागणी करण्याचा विषय नव्हे़ रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी सर्व सोयी-सुविधा पुरविणे ही त्यांची नैतिक जबाबदारी होय़ पण तरीही वर्षानुवर्षे या मागण्यांची निवेदने अधिकााऱ्यांना द्यावी लागतात़ ही बाब सुद्धा सिंह यांच्यासमोर स्पष्ट करण्यात आली़ रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी आता वस्ती वाढली आहे़ यशवंत हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्याथर्यंना रेल्वे पटरी ओलांडून ये-जा करावी लागते़ एका विद्यार्थिनींचा या ठिकाणी रेल्वेखाली येवून अपघाती मृत्यू झाला़ तरीही रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत़ प्रवासी शेड अपुरा पडतो़ पावसाळ्यात, उन्हाळ्यात प्रवाशांची कुचंबना होते़ आॅटो पार्किंगकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे़ थेट स्टेशनच्या पयारीपर्यंत आॅटो व इतर वाहनांची गर्दी होते़ अद्याप या स्टेशनमध्ये डिस्प्ले बोर्ड बसविले नाहीत़ दुसरीकडे धर्माबादच्या पुढे सर्व रेल्वेस्टेशनमध्ये सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा देण्यात आल्या़ त्या तुलनेत शेवटच्या टोकाला असलेल्या उमरी व शिवणगावला दक्षिण मध्य रेल्वेने हेतूपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे ठळकपणे जाणवते़ फ्लाय ओव्हर ब्रिजच्या संदर्भात रेल्वेची उदासिनता प्रकर्षाने जाणवते़ या सर्वच प्रश्नांवर करेंगे, हो जायेगा, आप लोगों का सहकार्य अपेक्षित है, अशी उत्तरे देवून रेल्वे अधिकारी वेळ मारून नेतात़ यावेळी शहरातील अनेक नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, पत्रकार, कर्मचारी उपस्थित होते़ (वार्ताहर)
कार्यशाळा संपन्न
अर्धापूर : तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांची कार्यशाळा संपन्न झाली़
अध्यक्षस्थानी सभापती जिजाबाई शंकरराव शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वयक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, गटविकास अधिकारी आऱ पी़ भिसे, गट शिक्षणाधिकारी एस़ एऩ कडेलवार, शंकरराव शिंदे, विस्तार अधिकारी सुचिता खल्लाळ, एस़ के़ पाटील उपस्थित होते़ सूत्रसंचालन केंद्रप्रमुख हंबर्डे तर विनोद देशमुख यांनी आभार मानले़
यशस्वीतेसाठी वाघमारे, पांडागळे, भोसले, संदीप रामशेटे, स्वाती चौडेकर, ज्योत्सना मासारकर, खिल्लारे यांनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)

Web Title: The departmental managers came and last

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.