शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

लाचखोरांना विभागप्रमुखांचे अभय; छत्रपती संभाजीनगरात सर्वात पुढे पोलिस !

By सुमित डोळे | Updated: June 9, 2025 20:36 IST

जानेवारी ते मे २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात ५१ कारवायांत ७५ लाचखोर अटकेत; संभाजीनगर परिक्षेत्रात पोलिसांचे सर्वाधिक १२, तर कृषीचे ७ प्रस्ताव प्रलंबित

छत्रपती संभाजीनगर : लाचखोरीच्या प्रकरणातील खटले पुढे सरकण्याऐवजी विभागप्रमुखांच्या मंजुरीअभावी संबंधीत फायली धूळ खात पडून राहतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेछत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील अशा तब्बल ५४ प्रकरणांमध्ये मंजुरी प्रलंबित असल्याची माहिती दिली आहे. प्रामुख्याने पोलिस, कृषी, महसूल, ग्रामविकास आदी महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. एसीबीकडून सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र तयार होऊनही विभागप्रमुख कारवाईस मंजुरी देत नसल्याने, लाचखोरांना अप्रत्यक्षरित्या प्रशासकीय अभय मिळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रक्रियेत बदल करण्याचे निर्देश देण्यात आले. आता तत्परतेने निर्णय न घेणाऱ्या विभागप्रमुखांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात लाचखोरीसंदर्भातील एकूण ३६६ प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी ५४ प्रकरणे एकट्या संभाजीनगर विभागात आहेत. लाचखोरीसारख्या गंभीर आरोपांप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) सापळा रचून आरोपी रंगेहाथ पकडले जातात. त्यानंतर सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र तयार करून संबंधित अधिकाऱ्याच्या विभागप्रमुखांकडे मंजुरीसाठी पाठवले जाते. पण, अनेक विभागप्रमुखांनी ही मंजुरी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याने खटले पुढे सरकत नाहीत.

विभागप्रमुखच सक्षम अधिकारीशासकीय सेवेतील अराजपात्रित (गट ब, क, ड) अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्धच्या खटल्यांसाठी कार्यलयाचे विभागप्रमुख सक्षम अधिकारी असतील. शासकीय महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासकीय विभागांनी सक्षम अधिकारी घोषित करण्याचे आदेश आहेत.

पोलिस विभागात सक्षम अधिकारी कोण?पोलिस निरीक्षकांबाबत – पोलिस महासंचालकसहायक पोलिस निरीक्षकांबाबत – विशेष महानिरीक्षक किंवा त्यावर वरील दर्जाचा अधिकारीपोलिस उपनिरीक्षकांबाबत – उपमहानिरीक्षक किंवा वरील दर्जाचा अधिकारीसहायक फौजदार, अंमलदार, नाईक, शिपाई – पोलिस अधीक्षक / उपायुक्त किंवा वरील दर्जाचा अधिकारी

कारवाया आणि अटकेचा तपशील-२०२४ मध्ये संपूर्ण परिक्षेत्रात १११ कारवायांमध्ये १७८ लाचखोरांना अटक-जानेवारी ते मे २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात ५१ कारवायांत ७५ लाचखोर अटकेत

एकूण ५४ प्रस्ताव प्रलंबितप्रलंबित प्रकरणेपोलिस १२, कृषी ७, ग्रामविकास ५ याव्यतिरिक्त महसूल विभाग, वित्त विभाग, वन, महावितरणचे प्रत्येकी ३, तर मनपा, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याणचे प्रत्येकी २, तसेच जलसंपदा, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक न्यास नोंदणी, सामाजिक व न्याय, सहकार, समाजकल्याण, रोहयो, नियोजन, परिवहन, गृह विभाग, भूमी अभिलेख आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रत्येकी १ प्रस्ताव प्रलंबित आहे.

आयुक्तांच्या समितीचा निर्णयमराठवाड्याच्या विविध विभागातून आलेल्या ६ अर्जांवर विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीने निर्णय दिला. २२ मे रोजी समितीची बैठक झाली होती. या बैठकीत जिल्हा वक्फ अधिकारी जालना, रोजगार हमी योजना, भूमिहीन शेतमजूर, शिक्षण विभाग, आपले सरकार पोर्टल विराेधातील अर्जांवर समितीने निर्णय दिला. लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईअंती निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांशी निगडीत एकही प्रकरण गेल्या बैठकीत समितीसमोर नव्हते. समितीसमोर आलेल्या अर्जांची तातडीने सुनावणी घेऊन ज्यांच्या विरोधात तक्रारी आहेत, त्या विभागाला, अधिकाऱ्याला समितीमार्फत निर्देश देण्यात येतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर