शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागाने स्थापले दहा भरारी पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:05 IST2021-05-07T04:05:41+5:302021-05-07T04:05:41+5:30
--- औरंगाबाद- जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्त भावात उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर भरारी पथके ...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागाने स्थापले दहा भरारी पथके
---
औरंगाबाद- जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्त भावात उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या दहा भरारी पथकाने जिल्हा व तालुकास्तरावर वेळोवेळी कृषी निविष्ठा विक्री केंद्राना भेटी देवून तपासण्या कराव्यात तसेच विक्री चढ्या भावाने होत नसल्याची खातरजमा करण्याचे आदेश जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार आणि जिल्हा कृषी अधीक्षक डाॅ. तुकाराम मोटे यांनी दिले आहेत.
भरारी पथकांनी रासायनिक खते व कीटकनाशकेबाबत उगम प्रमाणपत्र तपासणीची व्यापक मोहीम राबवावी, कागदपत्रे आढळून न आल्यास विक्री बंद आदेश बजवावेत. वितरक, उत्पादक व विक्रेते स्तरावर मुदतबाह्य निविष्ठांचा शोध घेऊन त्याची विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. इनव्हाईस बिल, विक्रीसाठी शिल्लक साठा, ई-पाॅस वरील साठ्याचा ताळमेळ तपासावा, तफावत आढळल्यास तत्काळ कारवाई करावी. वितरकाने विक्रीसाठीच्या प्रत्येक बियाणाच्या लॉटचा किमान एक नमुना ठेवल्याची खात्री करावी. अप्रमाणित, बोगस, अनधिकृत साठ्याचा शोध घेऊन जप्तीची कारवाई तसेच ज्या उत्पादक कंपनीचा पूर्वइतिहास खराब आहे, अप्रमाणित नमुने जास्त असतात, उधारीवर अगर कमी किमतीत माल पुरवून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते व निविष्ठा दुर्गम भागात पुरवठा करण्यात येतो, अशा कंपन्यांच्या निविष्ठांचा नमुना प्राधान्याने काढण्यात यावा. अधिसूचित नसलेले बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादीबाबत तात्काळ पोलिसांत गुन्हा दाखल करावा, असे आदेश नियुक्त भरारी पथकांना देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यांबाबत नियुक्त भरारी पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.--
नेमलेले भरारी पथक
--
जिल्हास्तरावर आनंद गंजेवार, डी. आर. भडीकर, आर. डी. दराडे, संतोष चव्हाण, औरंगाबाद तालुक्यासाठी हर्षदा जगताप, टी. टी. सांळुके, संतोष अंधोरीकर, एस. आर. मामीडवार, गंगापूर तालुक्यासाठी डी. एस. तारगे, टी.जी. आहेर, एस. वाय. मुंढे, आर.ए. पाटील, वैजापूर तालुक्यासाठी अनिल कुलकर्णी, मंगेश घोडके, संतोष अंधोरीकर, एस. एन. मुसने, कन्नड तालुक्यासाठी बाळराजे मुळीक एस. एल. तिडके, के. पी. बोराडे, डी. ए. जाधव, फुलंब्री तालुक्यासाठी सुभाष आघाव, काकासाहेब इंगळे, के.पी.बोराडे, आर. व्ही. शेख, पैठण तालुक्यासाठी संदीप सिरसाठ, एन. आर. थोरे, एस. वाय. मुंढे, व्ही. एस. पाटील, सिल्लोड तालुक्यासाठी दीपक गवळी, पी. पी. दापके, बी. व्ही. गावंडे, एस. सी. व्यास, सोयगाव तालुक्यासाठी संगीता पवार, टी. एन. हिवाळे, बी. व्ही. गावंडे, ए. पी. गवळी खुलताबाद तालुक्यासाठी विजय नरवडे, वैशाली पवार, के. पी. बोराडे खेडकर आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
---
तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, पर्यवेक्षक, पंचायत समिती कार्यालयात एक कृषी अधिकारी त्यांना सहायक कृषी अधिकारी (विस्तार) यांची नियुक्ती नऊ तालुक्यांतील भरारी पथकात करण्यात आली आहे. पथकाचे प्रमुख हे कृषी अधिकारी असून तालुक्यात शेतकऱ्यांना तेथील सनियंत्रण कक्षामध्ये आपली तक्रार नोंदविता येईल. या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करता येईल. ते शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण आणि सनियंत्रण ठेवण्याचे काम करतील.
-आनंद गंजेवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी