देवळाई वनक्षेत्रात वानराला सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:04 IST2021-06-26T04:04:52+5:302021-06-26T04:04:52+5:30
नितीन जाधव चिकलठाणा येथील मिनी घाटी, जिल्हा रुग्णालयाजवळील रोडवर एका माकडाला जखमी अवस्थेत पाहून वन विभागाला ...

देवळाई वनक्षेत्रात वानराला सोडले
नितीन जाधव चिकलठाणा येथील मिनी घाटी, जिल्हा रुग्णालयाजवळील रोडवर एका माकडाला जखमी अवस्थेत पाहून वन विभागाला कळविण्यात आले. तात्काळ वन परिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांनी रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाठविले. जखमी माकडाला पकडून त्याला तात्काळ खडकेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. गायकवाड यांनी उपचार केले. कार्यवाहीमध्ये वनरक्षक एच. के. घुशिंगे, वन्यजीव रेस्क्यू टीममध्ये नीतेश जाधव, वन्यजीव अभ्यासक श्रीकांत वाहुळे, सर्पमित्र पुष्पा जैवळ, प्राणिमित्र सागर कसाब, दादाराव जाधव आदींचा सहभाग होता. उपचारानंतर प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, त्यावेळी माकडाला त्याच्या आदिवासात वन विभागाच्या टीमने सोडले.
कॅप्शन...
उपचारानंतर माकडाला देवळाईच्या वनक्षेत्रात सोडण्यात आले.