शहरात डेंग्यूचा कहर
By Admin | Updated: August 4, 2014 01:55 IST2014-08-04T01:48:59+5:302014-08-04T01:55:30+5:30
औरंगाबाद : शहरात हळूहळू साथरोगांचा प्रसार वेगाने वाढतो आहे. गारखेडा, शिवाजीनगर, सिडको- हडकोतून डेंग्यू जटवाडा परिसरात सरकला आहे

शहरात डेंग्यूचा कहर
औरंगाबाद : शहरात हळूहळू साथरोगांचा प्रसार वेगाने वाढतो आहे. गारखेडा, शिवाजीनगर, सिडको- हडकोतून डेंग्यू जटवाडा परिसरात सरकला आहे. अवघे शहर डेंग्यूसह साथरोगांच्या विळख्यात आले आहे. साथरोगांनी ५ जणांचे बळी घेतले असून, आज जटवाडा प्रभागातील एकतानगर या भागात राहणाऱ्या भास्करराव वाघ यांचे डेंग्यूसदृश आजाराने निधन झाल्याचे नगरसेविका ज्योती वाघमारे यांनी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांना कळविले आहे.
एन-११ मधील दीपनगर येथे राहणारे योगेश मिरगे हा २८ वर्षीय युवक कावीळने, तर स्वराज कुंटे हा ४ वर्षीय मुलगा डेंग्यूने दगावला. तत्पूर्वी २२ जुलै रोजी बालाजी फंड हा एन-३ येथील १४ वर्षीय मुलगा डेंग्यूसदृश आजाराने दगावला. ३१ जुलै रोजी अश्विनी बोलकर या खेळाडूचा डेंग्यूनेच मृत्यू झाला. ३ आॅगस्ट रोजी भास्करराव वाघ यांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला.
साथरोग पसरलेले वॉर्ड
जटवाडा, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, गुरुदत्तनगर, अरिहंतनगर, विवेकानंदनगर, श्रीनिकेतन कॉलनी, नाथनगर, नक्षत्रवाडी, राजीव गांधीनगर, जयभवानीनगर, एन-५ साईनगर, पुंडलिकनगर, न्यू हनुमाननगर, कटकटगेट, फाजलपुरा, हर्षनगर, गांधीनगर, जाफरगेट, खोकडपुरा, गरमपाणी, नौबत दरवाजा या भागांत नाल्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नेहरूनगर, रहेमानिया कॉलनी, बेगमपुरा, शरीफ कॉलनी, जयभीमनगर, एन-११, मयूरनगर, नवनाथनगर, नवजीवन कॉलनी, बारी कॉलनी, विष्णूनगर, शिवशंकर कॉलनी, भानुदासनगर, बौद्धनगर, एकतानगर, वानखेडेनगर, मुकुंदवाडी, अंबिकानगर, बनेवाडी या भागांमध्ये डेंग्यूसदृश रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.