डेंग्यूसदृश्य तापीने जळगावात महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: September 25, 2014 00:53 IST2014-09-25T00:35:51+5:302014-09-25T00:53:00+5:30

जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे डेंग्यूसदृश्य तापाने मंगळवारी एका महिलेचा मृत्यू झाला. या तापाचा गावातील हा दुसरा तर जिल्ह्यातील सहावा बळी आहे.

Dengue swept death due to heat in Jalgaon | डेंग्यूसदृश्य तापीने जळगावात महिलेचा मृत्यू

डेंग्यूसदृश्य तापीने जळगावात महिलेचा मृत्यू


जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे डेंग्यूसदृश्य तापाने मंगळवारी एका महिलेचा मृत्यू झाला. या तापाचा गावातील हा दुसरा तर जिल्ह्यातील सहावा बळी आहे.
छाया सुभाष निकम (वय ४०) असे या मृत महिलेचे नाव आहे. गेल्या दीड महिन्यापासून या परिसरात डेंग्यूसदृश्य तापाने रुग्ण फणफणत आहेत. अशा रुग्णांनी परिसरातील दवाखाने भरलेले आहेत.
छाया निकम या महिलेला ताप आल्याने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निकम यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दहा ते बारा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. निकम यांना डेंग्यूसदृश्य तापाची लागण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास छाया निकम यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
दरम्यान, या साथरोगाने जळगाव सपकाळ व परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असून साथरोगाचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पथक येते, घरोघर तपासणी, धूरफवारणी करून निघून जाते.
मात्र नंतर या विभागाचे दुर्लक्ष होते, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
गावात व परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झाले असून दुर्गंधी सुटली आहे. या साथरोगानंतरही तेथे स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
जालना जिल्ह्यात गेल्या एक-दीड महिन्यापासून भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ, पद्मावती, कोदोली, अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव, वाघलखेडा इत्यादी परिसरात अनेक रुग्ण डेंग्यूसदृश्य तापाने फणफणले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तापाचा हा प्रकार कोणता, हे अधिकृतरित्या अद्यापही स्पष्ट केलेले नाही.

Web Title: Dengue swept death due to heat in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.