सेनगावात विद्यार्थ्यास डेंग्यू?
By Admin | Updated: August 13, 2014 00:24 IST2014-08-13T00:09:08+5:302014-08-13T00:24:52+5:30
हिंगोली : सेनगाव येथील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यास डेंग्युची लागण झाल्याने नांदेडच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सेनगावात विद्यार्थ्यास डेंग्यू?
हिंगोली : सेनगाव येथील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यास डेंग्युची लागण झाल्याने नांदेडच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सदरील विद्यार्थ्याचे नाव शूभम संतोष पदमगीरवार (वय १५) असे असून, अचानक ताप येऊ लागल्याने त्याला सेनगाव येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्याचा सल्ला दिला.
विद्यार्थ्याच्या पालकांनी त्यास नांदेडच्या खासगी रूग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती सुधारल्याचे सांगण्यात आले. सेनगाव येथील डॉक्टरांनी मात्र याबाबत स्पष्टपणे सांगितले नाही.
(प्रतिनिधी)