शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा राजकीय ताप!

By admin | Updated: August 2, 2014 01:43 IST

औरंगाबाद : शहरात डेंग्यू व इतर साथरोगांनी थैमान घालण्यास सुरुवात केली असून, त्याचे वेगवेगळ्या पातळ्यांवर राजकारण सुरू झाले आहे.

औरंगाबाद : शहरात डेंग्यू व इतर साथरोगांनी थैमान घालण्यास सुरुवात केली असून, त्याचे वेगवेगळ्या पातळ्यांवर राजकारण सुरू झाले आहे. एन-९ आणि एन-११ मध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले असल्यामुळे ‘मध्य’ विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी कधी नव्हे ते आज या निमित्ताने मतदाररूपी नागरिकांच्या भेटी घेऊन सतर्क असल्याचे दाखवून दिले. महापौर कला ओझा, आ. प्रदीप जैस्वाल, नगरसेवक राजगौरव वानखेडे आदींसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना डेंग्यूमुळे नागरिकांच्या संपर्कात येण्याची संधी मिळाली, तर मनसेचे सुमित खांबेकर, सतनामसिंग गुलाटी, संतोष पाटील, रवी गायकवाड यांनी प्रभाग ई आणि ब समोर जोरदार आंदोलन करून पालिकेवर निष्क्रियतेचे खापर फोडत दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तर दुसरीकडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. अक्रम सय्यद अब्बास यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. चार वर्षे कुठे गेले होते?दरवर्षी उन्हाळ संपण्याच्या आणि पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर साथरोग डोके वर काढतात. मागील चार वर्षांमध्ये डेंग्यूसदृश आजारामुळे अनेक जण दगावले. त्यावेळी नगरसेवक वगळता कुठलाही नेता, आमदार, इच्छुक नागरिकांच्या दारी गेल्याचे आठवत नाही. आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सगळी उठाठेव, पत्रकबाजीचे व आंदोलनाचे स्टंट सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. आरोग्य विभागावरून गटबाजीआरोग्य अधिकाऱ्यांवरून सेनेत दोन गट पडल्याची चर्चा आज होती. शिवसेनेच्या एका नेत्याच्या सांगण्यावरून डेंग्यूचे राजकारण सुरू करण्यात आल्याचीही चर्चा पालिकेत रंगत आहे. डॉ. टाकळीकर विरुद्ध डॉ. कुलकर्णी यातूनही कर्मचाऱ्यांत दोन गट पडल्याचे दिसते. काँग्रेसचे निवेदनकाँगे्रसने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डेंग्यू आजारापासून संरक्षणासाठी त्वरित नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अक्रम, विरोधी पक्षनेता रावसाहेब गायकवाड उपस्थित होते. झटापटीत एक जखमीसिडको प्रभाग कार्यालयात मनसे कार्यकर्ते शिरत असताना पोलिसांनी बळाचा वापर करीत कार्यालयाचे फाटक जोर लावून ढकलेले. त्यामध्ये मनसचे माजी शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या बोटांना इजा झाली. त्यामुळे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले, त्यांनी घोषणाबाजी केली.मनपालाच डेंग्यू झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अभिजित देशमुख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपालाच डेंग्यू झाला आहे. यंत्रणा तोकडी पडल्यामुळे शहरात साथरोगांनी थैमान घातले आहे. जनजागृतीमध्ये मनपा कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डेंग्यूसदृश भागात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.