शहरात डेंग्यूचा फैलाव!
By Admin | Updated: September 20, 2015 01:11 IST2015-09-20T00:57:18+5:302015-09-20T01:11:20+5:30
औरंगाबाद : शहरात डेंग्यू आजाराने डोके वर काढले असून, १ ते १० सप्टेंबरपर्यंत तब्बल १२ संशयित रुग्ण सापडले आहेत.

शहरात डेंग्यूचा फैलाव!
औरंगाबाद : शहरात डेंग्यू आजाराने डोके वर काढले असून, १ ते १० सप्टेंबरपर्यंत तब्बल १२ संशयित रुग्ण सापडले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यूचा मुकाबला करण्यासाठी कंबर कसली असून, शहरात सर्वत्र धूर फवारणी, औषध फवारणी, अॅबेट ट्रिटमेंट आदी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सोमवारी सकाळी मनपा आयुक्त प्रकाश महाजन स्वत: आरोग्य विभागाची बैठक घेणार आहेत.
शहराच्या वेगवेगळ्या भागात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. दिल्लीत डेंग्यूमुळे १६ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वेळीच उपाययोजना केल्यास डेंग्यू अधिक फैलावणार नाही, म्हणून काम सुरू केल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांनी दिली.
मोटारसायकल अपघातात एक ठार
औरंगाबाद : दोन मोटारसायकलींमध्ये समोरासमोर टक्कर झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात झाल्टा फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी घडला. पोलिसांनी सांगितले की, सांखेडा येथील रहिवासी दीपक गवळी (३०) हा तरुण आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोटारसायकलने बीडकडून औरंगाबादकडे येत होता. झाल्टा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत त्याची टक्कर झाली.
या घटनेत तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला. त्यास शासकीय रुग्णवाहिनीतून घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. चिकलठाणा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या रोडवर सतत अपघात होत असून वाहने सावकाश चालवावी, असे आवाहन पोलिसांनी केले.