साताऱ्यात डेंग्यूसदृश सोळा रुग्ण

By Admin | Updated: August 8, 2014 01:24 IST2014-08-08T01:09:27+5:302014-08-08T01:24:09+5:30

औरंगाबाद : सातारा गावात डेंग्यूसदृश आजाराचे ६ रुग्ण आढळून आले असून, दोन दिवसांपूर्वी १० असे एकूण १६ जण आढळून आले आहेत

Dengue-like sixteen patients in Satara | साताऱ्यात डेंग्यूसदृश सोळा रुग्ण

साताऱ्यात डेंग्यूसदृश सोळा रुग्ण



औरंगाबाद : सातारा गावात डेंग्यूसदृश आजाराचे ६ रुग्ण आढळून आले असून, दोन दिवसांपूर्वी १० असे एकूण १६ जण आढळून आले आहेत. खाजगी रुग्णालयातील रुग्णांची परिस्थिती सुधारत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
साठवलेल्या पाण्याचे हौद व ड्रम रिकामे करून ते कोरडे करण्याची मोहीम सातारा गावात राबविली जात आहे. प्रत्येक घरातील पाण्याचे नमुने तसेच रक्ताचे नमुने तपासण्याचे काम आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका करीत आहेत. १००० घरांच्या तपासणीत ५,६०० लोकांपेक्षा अधिक महिला व पुरुष, मुलांची तपासणी केली असता १६ लोकांना थंडीताप आढळून आला, तर जवळपास ६४ घरांतील साठवलेल्या पाण्यात डासांची अंडी आढळून आली आहे. त्यामुळे घरातील हौद, ड्रम रिकामे करून कोरडे करण्याचा सल्ला आशा स्वयंसेविकांनी तसेच आरोग्य, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिला आहे. छोट्या फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणीने दोन दिवसांत दोनच वॉर्ड फवारण्यात आले. इतर वॉर्डांतही लवकरात लवकर फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करावी, अशी ओरड ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी केली आहे.
डेंग्यूचा फैलाव होऊ नये म्हणून प्रत्येक वॉर्डातील कर्मचारी अधिकाऱ्यांकडे औषध फवारणी व अ‍ॅबेट औषध साठवलेल्या पाण्यात टाकण्यासाठी मागणी करीत आहेत. जिल्हा परिषदेने नवीन फॉगिंग मशीन पाठवावी, अशी मागणी राहुल शिंदे, ग्रा.पं. सदस्य अरुण कदम, राजू काका नरवडे, अयुब पठाण आदींनी केली आहे. पुणे येथे दुरुस्तीसाठी नेलेले फॉगिंग मशीन त्वरित आणून फवारणीचे काम हाती घेण्याची मागणी सातारा परिसरातील नागरिकांतून होत आहे.

Web Title: Dengue-like sixteen patients in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.