शहर व परिसरात डेंग्यूचा शिरकाव; दोघांना लागण

By Admin | Updated: August 6, 2014 02:35 IST2014-08-06T02:25:54+5:302014-08-06T02:35:49+5:30

औरंगाबाद : सिडको-हडको, सातारा व वाळूज परिसराबरोबरच शहराच्या विविध भागांतील नागरिकांमध्ये डेंग्यूची भीती पसरली आहे.

Dengue infestation in the city and surrounding area; Both infected | शहर व परिसरात डेंग्यूचा शिरकाव; दोघांना लागण

शहर व परिसरात डेंग्यूचा शिरकाव; दोघांना लागण

औरंगाबाद : सिडको-हडको, सातारा व वाळूज परिसराबरोबरच शहराच्या विविध भागांतील नागरिकांमध्ये डेंग्यूची भीती पसरली आहे. सातारा व सिडको-हडको परिसरात आज नव्याने दोन रुग्ण आढळले आहेत. शिवनेरी कॉलनीत राहणाऱ्या विपुल नरेश चोरडिया या १४ वर्षीय मुलाला डेंग्यू झाला असून एन-९ येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तर साताऱ्यातील रामदास गंगाधर बाहुले यांना ताप व अस्वस्थ वाटू लागल्याने काल खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता, १ लाख २७ हजार प्लेटलेट (रक्तपेशी) असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नगरसेवक अनिल जैस्वाल यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून विपुलला ताप आलेला असून त्याच्यावर लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या रक्ताचे नमुने डॉक्टर्सनी घेतले होते. त्यावरून विपुलला डेंग्यू झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे.
डेंग्यूसदृश आजाराने सिडको-हडकोमध्ये अक्षरश: थैमान घातले आहे. मनपाने कोम्बिंग आॅपरेशन सुरू केले आहे.
शुद्ध पाण्यात डेंग्यूचे डास होत असल्यामुळे अ‍ॅबेट या औषधीचे वाटप करण्यात येत असून आजवर दीड लाख घरांमध्ये औषधी वाटप करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. सिडको-हडको, हर्सूल, एन-३ या परिसरात आतापर्यंत चौघांचा डेंग्यूने बळी घेतला आहे.
५० टक्के वसाहती पूर्ण
नगरसेवक जैस्वाल यांच्या माहितीवरून रुग्णाची माहिती घेतली आहे. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. आरोग्य विभागाने कोम्बिंग आॅपरेशन गतिमान केले आहे. १ लाख ६२ हजार ८८६ घरांमध्ये अ‍ॅबेट ट्रिटमेंट केली आहे.
आज दिवसभरात ४४ हजार ७४९ घरांमध्ये अ‍ॅबेट वाटप केले आहे. २ लाख ७७ हजार ७११ घरांची पाहणी करण्यात येणार असून ५० टक्के वसाहतीतील घरे पूर्ण झाल्याचा दावा आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांनी केला.

Web Title: Dengue infestation in the city and surrounding area; Both infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.