डेंग्यू सदृश्य तापाची जिंतुरात लागण
By Admin | Updated: August 10, 2014 00:10 IST2014-08-09T23:43:57+5:302014-08-10T00:10:31+5:30
जिंतूर : शहरात डेंग्यु सदृश्य तापाची लागण जोरात सुरू असून अनेक लहान मुलांना उपचारासाठी परभणी-औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

डेंग्यू सदृश्य तापाची जिंतुरात लागण
जिंतूर : शहरात डेंग्यु सदृश्य तापाची लागण जोरात सुरू असून अनेक लहान मुलांना उपचारासाठी परभणी-औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात मात्र याबाबत फारसे गांभिर्य दिसत नाही.
जिंतूर शहरात वाढती अस्वच्छता, ठिकठिकाणी साचलेल्या नाल्या, रस्त्यावर पडणारा कचरा, डांसाचा प्रादुर्भाव, पालिकेचे दुर्लक्ष, आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार या सर्व चक्रव्युहात सर्वसामान्य नागरिक अडकला आहे. त्यामुळे शहरामध्ये तापीच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसांपासून शहरात परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. लहान मुलांना तापीचे लक्षण दिसत असल्याने त्यांना जिल्हास्तरावर किंवा औरंगाबाद येथे हलविण्यात येत आहे. लहान मुलांना ताप आल्यानंतर शरीराच्या पेशींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. परिणामी डेंग्यु सदृश्य आजार शहरात पाय रोवत आहे. आरोग्य विभाग पूर्वी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर फवारणी करून डासांचा नायनाट करीत असे. तर शहरी भागात पालिका प्रशासनही फवारणी करून डास निर्मूलन मोहीम हाती घेत असे. परंतु मागील काही वर्षांपासून याकडे दोन्ही विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शहरात तर ठिकठिकाणी कचरा व तुंबलेल्या नाल्या यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. (वार्ताहर)