दोन वर्षांत डेंग्यूचे ५२३ संशयित रुग्ण !
By Admin | Updated: May 15, 2017 23:50 IST2017-05-15T23:44:31+5:302017-05-15T23:50:26+5:30
लातूर : गेल्या दोन वर्षांत ५२३ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले असून, गत दोन वर्षांत डेंग्यू रुग्णांची संख्या घटली आहे.

दोन वर्षांत डेंग्यूचे ५२३ संशयित रुग्ण !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : उन्हाळ्यामुळे टंचाई जाणवू नये म्हणून नागरिकांत पाणी साठवणुकीचे प्रमाण जास्त असते. आठ दिवसांपर्यंत पाणी साठवून ठेवल्यामुळे डासोत्पत्ती होऊन डेंग्यू आजार उद्भवण्याची भीती असते. परंतु, आरोग्य विभागाच्या वतीने वारंवार जनजागृती करण्यात येत असल्याने या आजारावर नियंत्रण आणणे शक्य होत आहे. गेल्या दोन वर्षांत ५२३ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले असून, गत दोन वर्षांत डेंग्यू रुग्णांची संख्या घटली आहे.
तापीच्या साथीमुळे प्रामुख्याने डेंग्यू, चिकुनगुणिया अशा रुग्णांची संख्या वाढते. डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. उन्हाळ्याच्या कालावधीत बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे नागरिक पाण्याची साठवणूक करतात. अशा स्वच्छ पाण्यात एडीस एजिप्टाय नावाच्या डासामुळे डेंग्यू आजार उद्भवतो.