डेंग्यूचे १४४ संशयीत रूग्ण

By Admin | Updated: August 15, 2014 00:06 IST2014-08-15T00:01:18+5:302014-08-15T00:06:54+5:30

अनुराग पोवळे, नांदेड जिल्ह्यात १ जानेवारी ते १४ आॅगस्ट या कालावधीत जवळपास १४४ संशयीत रूग्ण आढळले़

Dengue 144 suspected patients | डेंग्यूचे १४४ संशयीत रूग्ण

डेंग्यूचे १४४ संशयीत रूग्ण

अनुराग पोवळे,  नांदेड
जिल्ह्यात १ जानेवारी ते १४ आॅगस्ट या कालावधीत जवळपास १४४ संशयीत रूग्ण आढळले़ शासकीय रूग्णालयात त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता त्यापैकी ४० रूग्णांना डेंग्यूची लागण होती़ मात्र उपचारानंतर ते आता ठणठणीत असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ़ एम़ टी़ साळवे यांनी दिली़ उपरोक्त कालावधीत ४ ठिकाणी किटकजन्य आजारांचा उद्रेकही झाला होता़ दुसरीकडे जिल्ह्यात चिकनगुनियाचा एकही रूग्ण आढळला नाही ही बाबही समाधानकारक आहे़
जिल्ह्यात जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत १४४ रक्तनमुने तपासले़ त्यातील ४० जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले़ यात एकाही चिकनगुनीयाच्या रूग्ण आढळला नाही़ उपचारानंतर हे रूग्ण बरे झाले आहेत़ मलेरियाचेही ४७ रूग्ण जिल्ह्यात आढळले आहे़ जानेवारी ते जुलैअखेरपर्यंत २७ हजार ९१५ रूग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले होते़ जिल्ह्यात एकाही ठिकाणी हिवताप साथीचा उद्रेक झाला नाही़ जिल्ह्यात किटकजन्य आजारांची साथ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत़ तापाच्या रूग्णांचे रक्तनमुने घेणे, संशयीतांच्या रक्ताची तपासणी, सांडपाणीसाठ्यामध्ये डासअळी तपासणी करणे, दूषित पाणी आढळून आल्यास पाणीसाठे रिकामे करणे, अबेटचा वापर, संशयीत रूग्ण आढळलेल्या गावातील घरामध्ये डास गोळा करून त्याची घनता काढणे, धुरफवारणी तसेच डास होवू नयेत यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत जनतेला मार्गदर्शन करण्यात येत आहे़ तसेच ज्या ठिकाणी आजाराची साथ पसरते तेथे आरोग्य पथकही ठेवण्यात येते़ पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे कीटकजन्य आजारांची शक्यता वाढते़ अशावेळी नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे़
आजारांचा चार ठिकाणी उद्रेक
जिल्ह्यात ४ ठिकाणी किटकजन्य आजारांचा उद्रेक आढळून आला आहे़ त्यात नांदेड महापालिका हद्दीतील देगाव चाळ, माहूर तालुक्यातील चोरड, गोंडवडसा आणि लोहा तालुक्यातील पेनूर या ठिकाणांचा समावेश आहे़ नांदेडमधील देगावचाळ व माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथील रूग्ण तर आॅगस्टच्या प्रारंभीच आढळले आहेत़ यापार्श्वभूमीवर महापालिकेने आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत़ तरीही तापीच्या रूग्णांची शहरात मोठी संख्या आढळत आहे़ जिल्हा शासकीय रूग्णालयासह खाजगी रूग्णालयातही अनेकजण उपचार घेत आहे़

Web Title: Dengue 144 suspected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.