भीमशक्तीची जिल्हा कचेरीसमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:19 IST2017-11-29T00:19:21+5:302017-11-29T00:19:52+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड प्रकरणी शासनाने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़

भीमशक्तीची जिल्हा कचेरीसमोर निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड प्रकरणी शासनाने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे हत्याप्रकरणी शासनाने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, याप्रकरणी तपासात कुचराई करणाºया पोलिसांना सहआरोपी करावे, जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील सरपंचाच्या घरावर हल्ला करणाºयांवर कारवाई करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे़ या आंदोलनात भीमशक्तीचे प्रशांत इंगोले, चंद्रकांत भोकरे, मधुकर गच्चे, आकाश कांबळे, देवीदास धाबे, मुरलीधर भोकरे, भाऊराव भदरगे, शत्रुघ्न वाघमारे, मो़अथर मो़दस्तगीर, श्रीधर गायकवाड, राम वाघमारे, जीवन दळवे, मंगेश लोलगे, आकाश सावंत, सिद्धांत सावंत, आशिष कांबळे, हर्षवर्धन कापसीकर, शेख अखील आदींंचा सहभाग होता.