दलित अत्याचाराविरुद्ध निदर्शने

By Admin | Updated: May 16, 2014 00:09 IST2014-05-15T23:35:16+5:302014-05-16T00:09:22+5:30

लातूर : दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्याविरोधात विविध सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांच्या वतीने गुरुवारी दुपारी निदर्शने करण्यात आली़

Demonstrations against Dalit oppression | दलित अत्याचाराविरुद्ध निदर्शने

दलित अत्याचाराविरुद्ध निदर्शने

लातूर : दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्याविरोधात विविध सामाजिक संघटना, संस्था व परिवर्तनवादी पक्ष, कार्यकर्त्यांच्या वतीने गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़ आंदोलकांनी हातात घेतलेली पादत्राणे दाखवून निषेध नोंदविला़ या आंदोलनात रामकुमार रायवाडीकर, लोकलढा संघटनेचे प्राचार्य मधुकर मुंडे, गणपतराव तेलंगे, श्रीहरी कांबळे, महाराष्ट्र अंनिसचे बाबा हलकुडे, सुधीर भोसले, वैजनाथ कोरे, सूर्यकांत वैद्य, संजय व्यवहारे, संजीवनीताई चिकाटे, प्रा़ दिनकर कांबळे, सोपान जाधव, अ‍ॅड़ मधुकर कांबळे, दिलीप आरळीकर, कॉ़ विश्वंभर भोसले, पांडुरंग देडे, शेषेराव चव्हाण, रामदास ससाणे, बाबुराव झाकडे, अंगदराव कांबळे, पंढरीनाथ कांबळे, दिपाली खरटमोल, जगन्नाथ सुरवसे, सत्यभामा माने, गोपाळ मगर, सुरज पाटील, राम बेले, राजकुमार तारे आदी सहभागी झाले होते़ नगर जिल्ह्यासह मराठवाड्यात जातीयवाद्यांकडून घडविण्यात आलेल्या दलित हत्याकांडातील सूत्रधारांवर कठारे कारवाई करण्यात यावी़ अशा घटनासंबंधी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकासह राजकीय नेत्यांना जबाबदार धरण्यात यावे़ सांत्वन, मदतीपेक्षा प्रथमत: हत्या थांबवाव्यात, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ या निदर्शनात प्रकाश कांबळे, पंढरीनाथ बेले, राबनभी शेख, बापुराव बेले, खुदबुद्दीन मुजावर, छाया चक्रे, काजल भुताळे, अश्विनी कांबळे, नामदेव बेले, हसिनाबी सय्यद, दिलशाद शेख, शमशादबी पठाण, सुरैय्या रायवाडीकर, खैरुनिसा शेख, शरद गवळी, बालिका शेळके, प्रशांत कांबळे, अश्विन वाघमारे, योगेंद्र कांबळे, किशोर शिंदे, श्रावण कांबळे, जी़ एम़ कांबळे, चंद्रकांत सिरसाटे, रघुनाथ बेडदे, शत्रुघ्न कांबळे आदी सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)राज्यात दलित अत्याचाराची शृंखला आहे. नगरनंतर जालना, बीड जिल्ह्यात दलित अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. राज्यातील दलित समाज असुरक्षित झाला आहे. त्यामुळे हे अत्याचार तात्काळ रोखून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रामकुमार रायवाडीकर यांनी केली.

Web Title: Demonstrations against Dalit oppression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.