वैजापूर पंचायत समितीसमोर अंगणवाडी सेविकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST2021-07-14T04:07:28+5:302021-07-14T04:07:28+5:30
अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांचे निवेदन १५ जून रोजी देण्यात आले होते. मात्र, त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे वैजापूर ...

वैजापूर पंचायत समितीसमोर अंगणवाडी सेविकांची निदर्शने
अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांचे निवेदन १५ जून रोजी देण्यात आले होते. मात्र, त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे वैजापूर आयटकच्या वतीने निदर्शने करून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. पोषण ट्रॅकर ॲप जोपर्यंत मराठीत करत नाहीत, तोपर्यंत त्यात अंगणवाडी सेविका कुठलीही माहिती भरणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच अंगणवाडी सेविकांची २०१८ पासूनची थकीत प्रवास भत्ता बिले, अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या रिक्त जागा भरती, पर्यवेक्षिकांच्या रिक्त जागांची भरती सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा १५ दिवसांनी आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष कॉ. शालिनी पगारे, उपाध्यक्ष कॉ. शबाना शेख, सचिव पंचशीला धनेश्वर, उपाध्यक्ष कल्पना माळी आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन : अंगणवाडी सेविका एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देताना.