आयुक्तालयासाठी धरणे आंदोलन
By Admin | Updated: February 11, 2015 00:27 IST2015-02-11T00:22:05+5:302015-02-11T00:27:32+5:30
लातूर : गुणवत्तेच्या निकषावर लातुरात विभागीय आयुक्तालय स्थापन करावे, या प्रमुख मागणीसाठी आयुक्तालय संघर्ष समितीच्या वतीने गांधी चौकात

आयुक्तालयासाठी धरणे आंदोलन
लातूर : गुणवत्तेच्या निकषावर लातुरात विभागीय आयुक्तालय स्थापन करावे, या प्रमुख मागणीसाठी आयुक्तालय संघर्ष समितीच्या वतीने गांधी चौकात मंगळवारी सकाळी ११ ते ३ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संघटना, नागरीक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
लातूर जिल्ह्यात ३४ विभागीय कार्यालये आहेत़ आयुक्तालयासाठी इमारतही तयार आहे़ मात्र शासनाने नांदेड आयुक्तालयाचा घाट घातला आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला़ लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातून नोंदविण्यात आलेल्या हरकतीवर सुनावणी घेऊन मग आयुक्तालयाचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली़ धरणे आंदोलनात लातूरसह उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला़ या धरणे आंदोलनाची सुरुवात स्वातंत्र्य सेनानी मुर्गाप्पा खुमसे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली़ यावेळी अॅड़ मनोहर गोमारे, अॅड़उदय गवारे, महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, माजी आ़ वैजनाथ शिंंदे, मोईज शेख, पप्पु देशमुख, वसंत भरडे, डी़एऩ शेळके, अशोक गोविंदपूरकर, मकरंद सावे, बबन भोसले, राहूल माकणीकर, श्रीकांत सूर्यवंशी, अॅड़ वसंत उगीले, रेखा कदम, सुनीता चाळक, विष्णू साठे, रवी सुडे, प्रा़ दत्ता सोमवंशी, प्रा़संजय मोरे, राजू पाटील, डॉॅ़ सिध्दार्थ सूर्यवंशी, कैलास सोनकांबळे, एऩएम़ क्षीरसागर, सत्यपाल वाघमारे, अॅड़ अण्णाराव पाटील, अॅड़धनंजय पाटील, अॅड़ किसनराव सोनवणे, डी़एऩ भालेराव, रघुनाथ बनसोडे, धम्मदीप बलांडे, अशोक कांबळे, अंबाजोगाईचे अनंत गंगणे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते़