जिल्हा कचेरीवर मूकमोर्चा
By Admin | Updated: May 26, 2017 00:35 IST2017-05-26T00:33:02+5:302017-05-26T00:35:50+5:30
उस्मानाबाद : विठ्ठल तिडके याच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘महापुरूष सर्वांचे; माझा राजा शिवाजी राजा’ या बॅनरखाली निषेध मुकमोर्चा काढण्यात आला़

जिल्हा कचेरीवर मूकमोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याबाबत अपशब्द वापरून शिवप्रेमींच्या भावनांना ठेच पोहोचविणाऱ्या विठ्ठल तिडके याच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘महापुरूष सर्वांचे; माझा राजा शिवाजी राजा’ या बॅनरखाली निषेध मुकमोर्चा काढण्यात आला़ विठ्ठल तिडके याच्यावर कठोर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली आहे़
छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विठ्ठल तिडके याच्या निषेधार्थ दोन दिवसांपूर्वी निषेध सभा घेण्यात आली होती़ या सभेमध्ये तिडकेच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा व त्याच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती़ या मागणीसाठी गुरूवारी २५ मे रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ‘महापुरूष सर्वांचे; माझा राजा शिवाजी राजा’ या बॅनरखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मुकमोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात एम़डी़देशमुख, विश्वास शिंदे, धनंजय शिंगाडे, धर्मवीर कदम, पांडुरंग लाटे, शमीयोद्दीन मशायक, नितीन शेरखाने, विष्णू इंगळे, सुरेश शेरखाने, महादेव माळी, अॅड़ मनिषा राखुंडे, संपत डोके, अंबादास दानवे, दत्ता बंडगर, माणिक बनसोडे, मसूद शेख, मुकेश नायगावकर, इलियास पिरजादे, संजय मुंडे, संजय वाघमारे, रोहित निंबाळकर आदींनी घडल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करीत मनोगत व्यक्त केले़ या मोर्चात सर्व जाती-धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले़