व्यापा-याच्या हत्येच्या निषेधार्थ मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:24 IST2017-11-16T23:24:52+5:302017-11-16T23:24:56+5:30

व्यापारी केशरचंद जाजू यांच्या हत्येच्या निषेधार्थ गावातील व्यापारी व नागरिकांनी काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढला. पोलिसांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली.

 Democrat protest against the murder of the businessman | व्यापा-याच्या हत्येच्या निषेधार्थ मूकमोर्चा

व्यापा-याच्या हत्येच्या निषेधार्थ मूकमोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
लासूर स्टेशन : येथील व्यापारी केशरचंद जाजू यांच्या हत्येच्या निषेधार्थ गावातील व्यापारी व नागरिकांनी काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढला. पोलिसांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली.
लासूर स्टेशन येथे काही दिवसांतच दोन खून व इतर गुन्हेगारी कारवाया घडल्या. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना आळा बसावा, घडलेल्या घटनेचा तपास लवकर लागावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
गुरुवारी सकाळी श्री गणेश मंदिरापासून व्यापारी ग्रामस्थ तसेच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत निषेध मूक मोर्चा काढण्यात आला. मेन रोडमार्गे आशोक कॉलनी ते शिवाजी मैदानावर निषेध सभा घेऊन पोलिसांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, सपोनि. मिलिंद खोपडे यांना गुन्हेगारांचा तपास लावून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन दिले.

Web Title:  Democrat protest against the murder of the businessman