कुलगुरुंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मूकमोर्चा
By Admin | Updated: August 3, 2014 00:59 IST2014-08-03T00:25:23+5:302014-08-03T00:59:44+5:30
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू यांच्या दालनात घुसून त्यांच्या अंगावर शाई फेकण्याच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी
कुलगुरुंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मूकमोर्चा
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू यांच्या दालनात घुसून त्यांच्या अंगावर शाई फेकण्याच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी विद्यापीठातील कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी आणि मजुरांनी २ आॅगस्ट रोजी मूकमोर्चा काढला़
१ आॅगस्ट रोजी कुलगुुरूंवर शाई फेकण्याचा प्रकार झाला होता़ या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शनिवारी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून हा मोर्चा काढण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात विद्यापीठातील कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी व मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांना मकृवि कर्मचारी संघ, विद्यार्थी संघटना, कास्ट्राईड संघटना आदींनी निवेदन देऊन हल्लेखोरांविरूद्ध कडक कारवाईची करण्याची मागणी करण्यात आली़
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले़ मोर्चामध्ये कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रा़ दिलीप मोरे, सरचिटणीस डी़टी़ पवार, उपाध्यक्ष प्रदीप कदम, जी़ बी़ शिंदे, प्रा़ जनार्धन कातकडे, कृष्णा जावळे, सुभाष जगताप, कास्ट्राईड संघटनेचे अध्यक्ष डॉ़ जी़ के़ लोंढे, विद्यार्थी संघटनेचे अनिल गाढे, गाडगे, परिहार, भुजबळ, बागल, ओम शिसोदी, किरण डोंबे, उमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला़ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रशासनातील शिक्षण संचालक डॉ़ अशोक ढवण, संचालक संशोधन डॉ़ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ़ बी़ बी़ भोसले, उपकुल सचिव रवि जुकटे, बी़ एम़ गोरे, सहाय्यक कुलसचिव नागुल्ला यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, अधिकारी, प्राध्यापक, आस्थापना विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
(प्रतिनिधी)
सतर्क रहावे-सिंह
जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी विद्यापीठाच्या सभागृहात येऊन मोर्चेकरांना मार्गदर्शन केले़ प्रत्येकाने आपले कर्तव्य व जबाबदारी समजून विद्यापीठात घडणाऱ्या अप्रिय घटनांबाबत वेळीच जिल्हा प्रशासनाला अवगत करावे, यापुढे अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सर्वांनी सतर्क रहावे, असे आवाहन त्यांनी केले़