महिला लोकशाही दिन नावापुरताच !
By Admin | Updated: November 21, 2014 00:47 IST2014-11-21T00:44:19+5:302014-11-21T00:47:15+5:30
उस्मानाबाद : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न व अडचणी सोडवून घेण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून प्रत्येक महिन्याला तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन

महिला लोकशाही दिन नावापुरताच !
स्वतंत्र विदर्भाचा एल्गार : शरद जोशी यांच्या नेतृत्वात ३० रोजी धडक
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला असून ३० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील धरमपेठ त्रिकोणी पार्क येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते अॅड. वामनराव चटप यांनी पत्रपरिषदेत दिली.
स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय येथील शेतकऱ्यांचा आणि एकूणच विदर्भाचा विकास अशक्य आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याच्या घोषणा केल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अनेकदा स्वतंत्र विदर्भाची भूमिका मांडली होती. आजही ते विदर्भाचे समर्थन करतात. सध्या ते मुख्यमंत्री आहे. त्यांनी दिलेल्या वचनांची पूर्ती त्यांनी आता करावी, याची आठवण करून देण्यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. यासोबतच कापसाला ६ हजार रुपये, सोयाबीनला ५ हजार रुपये, धानाला ३ हजार रुपये देण्याची मागणी करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी हे स्वत: या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहे.
आंदोलनात सहभागी व्हा
शरद जोशी यांच्या नेतृत्वात ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक दिली जाईल. या आंदोलनात विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला गुणवंत पाटील हंगर्गेकर,राम नेवले, सरोज काशीकर, शैलाताई देशपांडे, अॅड. दिनेश शर्मा आदी उपस्थित होते.