लोंढा ओसरला !
By Admin | Updated: October 30, 2014 00:26 IST2014-10-30T00:18:08+5:302014-10-30T00:26:54+5:30
उस्मानाबाद : शिक्षक पात्रता परिक्षेसाठी (टीईटी) सध्या अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देवू इच्छिणाऱ्यांच्या संख्येत ५० टक्क्यांनी घट झाल्याचे चित्र समोर आले आहे.

लोंढा ओसरला !
उस्मानाबाद : शिक्षक पात्रता परिक्षेसाठी (टीईटी) सध्या अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देवू इच्छिणाऱ्यांच्या संख्येत ५० टक्क्यांनी घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. मागीलवर्षी साडेबारा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र यावर्षी हा आकडा साडेसहा हजारांच्या आतच रेंगाळला आहे.
शिक्षक पात्रता परिक्षेकडे मागील वर्षी विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात होता. अर्ज भरण्यासाठी रांगाच्या रांगा लागत होत्या. यावर्षी अर्ज भरण्यास एक आॅक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही दिवस तुरळक विद्यार्थी अर्ज भरताना दिसत असत. मात्र कालांतराने विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. परंतु गतवर्षीच्या तुलनेमध्ये ही गर्दी अत्यंत कमी आहे. गतवर्षी १२ हजार ५०० अर्ज दाखल झाले होते. परंतु यावेळी केवळ ६ हजार ४१८ जणांनी अर्ज केले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी ३० आॅक्टोबरही शेवटची तारीख असल्याने या संख्येत थोड्याफार प्रमाणात वाढ होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
१४ डिसेंबर रोजी परीक्षा
शिक्षक पात्रता परिक्षेसाठी हजारोंच्या घरात अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच १४ डिसेंबर रोजी यांची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना आपापल्या तालुक्यातच अर्ज दाखल करता यावेत, यासाठी यंदा तालुक्याच्याही ठिकाणी अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच मुख्यालय असलेल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागातही अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळली असल्याचे सांगण्यात आले.
लाखो रुपये तिजोरीत
४शिक्षक पात्रता परिक्षेसाठी विशिष्ट शुल्क आकारण्यात येत आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एका पेपरसाठी अडीचशे तर दोन पेरसाठी पाचशे रुपये आकारले जातात. तसेच अन्य विद्यार्थ्यांना एका पेपरसाठी ५०० तर दोन पेपरसाठी ८०० रुपये शुल्क आहे. त्यामुळे या शुल्काच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत लाखोंची भर पडण्यास मदत झाली आहे.