डीम ट्रेन्ड शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:42 IST2017-09-13T00:42:46+5:302017-09-13T00:42:46+5:30
पूर्ण हयातभर शिक्षक म्हणून सेवा बजावणाºया अप्रशिक्षित शिक्षकांना सेवानिवृत्तीच्या आठ ते दहा वर्षांनंतरही पेन्शन मिळत नसल्याने ते वारंवार चकरा मारत असून २0१३ च्या शासन निर्णयाप्रमाणे हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी.के.हिवाळे यांनी दिले.

डीम ट्रेन्ड शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न कायमच
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पूर्ण हयातभर शिक्षक म्हणून सेवा बजावणाºया अप्रशिक्षित शिक्षकांना सेवानिवृत्तीच्या आठ ते दहा वर्षांनंतरही पेन्शन मिळत नसल्याने ते वारंवार चकरा मारत असून २0१३ च्या शासन निर्णयाप्रमाणे हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी.के.हिवाळे यांनी दिले.
१ जुलै १९७२ नंतर नेमणूक झालेल्या अप्रशिक्षित शिक्षकांबाबत शासनाचे धोरण संदिग्ध होते. नंतर २0१३ मध्ये हा प्रश्न निकाली काढला. परभणी जि.प.ने अशा शिक्षकांना पेन्शनही सुरू केले. मात्र हिंगोली जिल्ह्यात हा प्रश्न कायम आहे. याबाबत जि.प.सदस्य डॉ.सतीश पाचपुते यांनी शिक्षकांसह हिवाळे यांची भेट घेतली. त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. निवेदनावर जी.एन. कांबळे, डी.व्ही. लोंढे, आर.जी. बलखंडे, ए.एस. कांबळे, जी.डी. गायकवाड, के.जी. खंदारे, के.डी. साबळे, टी.एस. डुकरे, ए.एस. पिंपरे, एच.के. पांढरे आदी १४ जणांच्या सह्या आहेत.