कंधार तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:45 IST2017-08-20T00:45:17+5:302017-08-20T00:45:17+5:30
कंधार तहसीलमध्ये निवडणूक लिपिक बालाजी जाधव यांना सुरक्षा कक्षाचे (स्ट्राँग रुम)चे सील विना परवानगी उघडल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार जबाबदार असताना लिपिकावर केलेली कारवाई संतापजनक असून या प्रकरणी तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी केली आहे

कंधार तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: कंधार तहसीलमध्ये निवडणूक लिपिक बालाजी जाधव यांना सुरक्षा कक्षाचे (स्ट्राँग रुम)चे सील विना परवानगी उघडल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार जबाबदार असताना लिपिकावर केलेली कारवाई संतापजनक असून या प्रकरणी तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात न्यायालयात प्रकरण असतानाही स्ट्राँग रुम सील तोडल्या प्रकरणी निलंबित केले आहे. विशेष म्हणजे जाधव यांना कंधार तहसीलदारांनीच तोंडी सुचनेनुसार ईव्हीएमची माहिती तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र तक्रार झाल्यानंतर तहसीलदारांनी लिपिकावरच संपूर्ण जबाबदारी ढकलली. यामुळे महसूल कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला असून कंधार तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी केली. १९ आॅगस्ट रोजी सुरू केलेले आंदोलन दुपारीच संपुष्टात आले. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष कुणाल जगताप, माधव डांगे, गिरीष येवते, माधव देमगुंडे, शंकर मगडेवार आदींची उपस्थिती होती. या आंदोलनात नेत्यांच्या भूमिकेबद्दल कर्मचाºयांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणतेही ठोस आश्वासन मिळण्यापूर्वीच आंदोलन मागे घेतल्याची चर्चा कर्मचाºयात होती.