अंबाजोगाईत चित्रनगरी उभारण्याची मागणी
By Admin | Updated: June 3, 2014 00:43 IST2014-06-02T23:45:44+5:302014-06-03T00:43:34+5:30
अंबाजोगाई : राज्याचे पुणे म्हणून ओळखल्या जाणार्या अंबाजोगाई येथील सांस्कृतिक वैभव लक्षात घेऊन शासनाने चित्रनगरी उभारावी, अशी मागणी शेख अजीज शेख लतीफ यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अंबाजोगाईत चित्रनगरी उभारण्याची मागणी
अंबाजोगाई : राज्याचे पुणे म्हणून ओळखल्या जाणार्या अंबाजोगाई येथील सांस्कृतिक वैभव लक्षात घेऊन शासनाने चित्रनगरी उभारावी, अशी मागणी शेख अजीज शेख लतीफ यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अंबाजोगाई हे संतांचे माहेरघर, कवी मुकुंदराज, दासोपंत, मनोहर अंबानगरी, जैन धर्मियांचे पवित्र तीर्थ, शिक्षणाची पंढरी, स्वामी रामानंद तीर्थ यांची कर्मभूमी आहे. या नगरीत थोर साहित्यिक, नाटककार, रसिक कलाकार झाले आहेत. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा येथे नाट्यविभाग आहे. तसेच निसर्गाचे देखणे वैभव लाभलेले आहे. पंचवीस वर्षात मराठवाड्यात २५ चित्रपट तयार झाले. त्यापैकी बहुतांश चित्रपटांचे चित्रीकरण अंबाजोगाईत झाले. कलाकार व रसिकांची खाण असलेल्या या नगरीत चित्रनगरी उभारल्यास निर्माता व कलावंतांना सोयीचे ठरेल व चित्रपट निर्मितीला चालना मिळेल. त्यामुळे अंबाजोगाईत चित्रनगरी उभारण्याची मागणी शेख अजीज शेख लतीफ यांनी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)