भक्त निवास ते लालमाती रस्ता करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST2020-12-17T04:32:07+5:302020-12-17T04:32:07+5:30
खुलताबाद : भद्रा मारुती भक्त निवास ते लालमाती (मोठे शिवार) शेतरस्ता तयार करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे ...

भक्त निवास ते लालमाती रस्ता करण्याची मागणी
खुलताबाद : भद्रा मारुती भक्त निवास ते लालमाती (मोठे शिवार) शेतरस्ता तयार करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.
खुलताबाद तहसील कार्यालयासमोरून जाणाऱ्या भद्रा मारुती भक्त निवास ते लालमाती या शेत रस्त्यावर शेकडो शेतकऱ्यांची शेती आहे. हा रस्ता अत्यंत अरुंद व धोकादायक पांदी रस्ता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल बाजारात नेण्यासाठी व शेती मशागत करताना खते, यंत्रसामुग्री नेण्यासाठी मोठी अडचण होत आहे. सातत्याने होणाऱ्या या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी केली आहे. हे निवेदन देताना नवनाथ बारगळ, मिठ्ठू पा. बारगळ, शिवाजी फुलारे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो कॅप्शन :
खुलताबाद भक्त निवास ते लालमाती मोठे शिवार शेतरस्त्यासाठी नवनाथ बारगळ, मिठ्ठू पा. बारगळ व शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.