टेंभापुरी पाटचाऱ्याची दुरुस्ती करून पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:05 IST2021-04-10T04:05:31+5:302021-04-10T04:05:31+5:30
टेंभापुरी धरण यावर्षी शंभर टक्के भरले. सध्या धरणात भरमसाठा असल्याने या धरणातून काढण्यात आलेल्या पाटचारीला गुरुवार ...

टेंभापुरी पाटचाऱ्याची दुरुस्ती करून पाणी सोडण्याची मागणी
टेंभापुरी धरण यावर्षी शंभर टक्के भरले. सध्या धरणात भरमसाठा असल्याने या धरणातून काढण्यात आलेल्या पाटचारीला गुरुवार रोजी पाणी सोडण्यात आले होते. परंतु या पाटचारीची दुरुस्ती न करताच पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी टेंभापुरी धरणावर धडक मारीत आधी पाटचाऱ्याची दुरुस्ती करा नंतरच पाटाला पाणी सोडा, असा पवित्रा घेतला. अखेर अधिकाऱ्यांनी पाणी बंद केले.
यावेळी राहुल ढोले, उपसरपंच संतोष खवले ,बाळासाहेब शेळके, संतोष नवले, संदीप पाटेकर, शहिद शेख, बाबासाहेब जाधव, शेख अनिस आदी पदाधिकाऱ्यांसह कैलास गावंडे, अनिल खवले, कल्याण पाटेकर, उपसरपंच सुदर्शन प्रेमभरे, तुळशीराम रोकडे, डिंगबर ढोले, कृष्णा मुळे, साईनाथ ढोले, ज्ञानेश्वर इंगळे, अनिल ढोले आदींची उपस्थिती होती.