ब्ल्यू व्हेलची लिंक हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:35 IST2017-09-05T00:35:07+5:302017-09-05T00:35:07+5:30
डेथ गेम म्हणून कूप्रसिद्ध झालेल्या ब्ल्यू व्हेल या गेमची लिंक हटविण्याची मागणी विणकर कॉलनीतील विणकर वसाहत गणेश मंडळाच्या वतीने जिल्हधिकाºयांकडे केली आहे.

ब्ल्यू व्हेलची लिंक हटविण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : डेथ गेम म्हणून कूप्रसिद्ध झालेल्या ब्ल्यू व्हेल या गेमची लिंक हटविण्याची मागणी विणकर कॉलनीतील विणकर वसाहत गणेश मंडळाच्या वतीने जिल्हधिकाºयांकडे केली आहे.
डीएमके पक्षाचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलीन यांनी इंटरनेट व सोशल मीडियातून ब्ल्यू व्हेल गेमची लिंक हटविण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीस मंडळाने पाठिंबा दिला आहे. निवेदनावर धनंजय गुमलवार, शिवशंकर सिरमेवार, उमेश कोकूलवार, राजेश जेसू, गजानन गुडेवार, अनिल गुडेवार, बालाजी भंडारे आदींच्या स्वाक्षºया आहेत़