वन सैनिकांना व्हेंटिलेटर बेड राखीव ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:02 IST2021-05-13T04:02:56+5:302021-05-13T04:02:56+5:30
सोयगाव : शाश्वत ऑक्सिजनची निर्मिती वाढविण्यासाठी कोरोना काळातही जीवाची पर्वा न करता राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वनाचे संरक्षण करणाऱ्या राज्यातील ...

वन सैनिकांना व्हेंटिलेटर बेड राखीव ठेवण्याची मागणी
सोयगाव : शाश्वत ऑक्सिजनची निर्मिती वाढविण्यासाठी कोरोना काळातही जीवाची पर्वा न करता राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वनाचे संरक्षण करणाऱ्या राज्यातील वन सैनिकांना कोविड बेड व्हेंटिलेटरसह राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. सोयगाव वन विभागातील कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र पाठविले.
राज्यभरातील वनसैनिक कोरोना काळातही जिवाची पर्वा न करता मौल्यवान वृक्षे, वन्यप्राणी, पक्ष्यांच्या संरक्षणासाठी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. राज्यातील वनसैनिक कोरोना संसर्गाने बाधित झाले असून, काही रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडावे लागले. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांसाठी व्हेंटिलेटरयुक्त बेड राखीव ठेवली जावीत. जेणेकरून त्यांना वेळेवर उपचार मिळतील. वनसेवा करताना मृत झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना पन्नास लाखाची मदत करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. या निवेदनावर वनपाल अनिल पाटीलसह अन्य कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.