वाळू लिलाव रद्द करण्याची मागणी
By Admin | Updated: November 19, 2014 13:21 IST2014-11-19T13:21:40+5:302014-11-19T13:21:47+5:30
सध्या निर्माण झालेली दुष्काळस्थिती लक्षात घेता गोदावरी पात्रातील वाळूचे लिलाव रद्द करावेत, अशी मागणी आ. मोहन फड यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.

वाळू लिलाव रद्द करण्याची मागणी
परभणी : सध्या निर्माण झालेली दुष्काळस्थिती लक्षात घेता गोदावरी पात्रातील वाळूचे लिलाव रद्द करावेत, अशी मागणी आ. मोहन फड यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
सोनपेठ व पाथरी तालुक्यात गोदावरी पात्रातील वाळूची लिलाव पद्धतीने विक्री होत आहे. वाळू उपस्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. ठेकेदार र्मयादेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करतात. त्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. वाळू विक्रीतून मिळालेला महसूल आणि रस्त्यांचे होणारे नुकसान याचा विचार केला तर नुकसानच अधिक होत आहे. वाळू उपशामुळे जनतेत रोष व्यक्त होत आहे. तेव्हा दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता गोदावरी पात्रातील वाळूचा लिलाव रद्द करावा, अशी मागणी आ. मोहन फड यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. (/प्रतिनिधी)